क्रिकेटविश्वात शनिवारी (4 सप्टेंबर) झिम्बाब्वे क्रिकेट संघाने धुमाकूळ घातला. झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील (AUSvsZIM) तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला आहे. टोनी आर्यलंड स्टेडियम, टाउन्सविल येथे झालेल्या सामन्यात झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाचा 3 विकेट्सने पराभव केला आहे. हा झिम्बाब्वेचा ऑस्ट्रेलियातील ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिलाच विजय ठरला आहे. या विजयामध्ये पुन्हा एकदा अष्टपैलू रेयान बर्ल हा स्टार ठरला आहे. त्याने या सामन्यात एक विक्रम करताना दिग्गजांना मागे टाकले आहे.
या सामन्यात नाणेफेक महत्वाची ठरली आहे. कारण या मैदानावर जो प्रथम गोलंदाजी करतो तोच संघ जिंकतो. येथे आतापर्यंत 5 सामने झाले असून त्यातील सर्व सामने पहिली गोलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. तर झिम्बाब्वेचा कर्णधार रेगिस चकाब्वा याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी फिरकीपटू रेयान बर्ल (Ryan Burl) याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 34वा वनडे सामना खेळताना ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना सळो की पळो करून सोडले होते.
रेयानने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेमध्ये सर्वात कमी धावा देताना पाच विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. असे करताना त्याने भारताचा माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री (Ravi Shastri) आणि वेस्ट इंडिजचे कर्टली अँब्रोस (Curtly Ambrose) यांना मागे टाकले आहे. रेयानने त्याने 3 षटके टाकताना 10 धावा देत 5 विकेट्स घेतल्या आहेत. तर शास्त्री यांनी 1991मध्ये 15 धावा देत 5 विकेट्स घेतल्या होत्या, तर 1988मध्ये अँब्रोसने 17 धावा देताना 5 विकेट्स घेतल्या होत्या.
रेयानने डेविड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, एश्टन एगर, मिचेल स्टार्क आणि जोश हेजलवूड यांना बाद केले. त्याने ऑस्ट्रेलियाच्या शेवटच्या पाच विकेट्स घेतल्या. यामुळे ऑस्ट्रेलियाने 31 षटकात सर्वबाद 141 धावसंख्या उभारली. लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेने चांगली सुरूवात केली, मात्र हेजलवूडने एका मागोमाग एक धक्के दिले. त्याने 10 षटकात 30 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. तर फलंदाजीतही रेयानने कमाल केली. त्याने एक षटकार आणि चौकार मारत 17 चेंडूत 11 धावा केल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अल्टिमेट खो-खो स्पर्धेत तेलगु योद्धाज व ओडिशा जगरनट्स यांच्यात विजेतेपदासाठी लढत
विराटनंतर पदार्पण केलेले ‘हे’ तिघे खेळणार लिजेंड्स लीग; एक नाव चकित करणारे
स्वप्नपूर्ती! अखेर टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूच्या दारात लागली नवीकोरी मर्सिडीज; पाहा छायाचित्रे