भारतीय क्रिकेटपटू हे वाहनांचे चांगले शौकीन असल्याचे दिसून येतात. माजी भारतीय कर्णधार एमएस धोनी याच्याकडे 100 च्या आसपास दुचाकी व चारचाकी असल्याचे सर्वज्ञात आहे. इतरही खेळाडूंकडे जगातील अनेक महागड्या ब्रँडच्या गाड्या आहेत. सचिन तेंडुलकर व विराट कोहली यांना अनेक प्रसिद्ध वाहन कंपन्यांनी आपले ब्रँड अँबेसिडर बनवले आहे. त्याचवेळी आता भारताच्या आणखी एका क्रिकेटपटूने नवी कोरी मर्सिडीज घेतल्याचे सार्वजनिक केले.
भारताचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकतने नवीन मर्सिडीज कार खरेदी केली असून, त्याचा फोटो आणि व्हिडिओ त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला आहे. उनाडकतने कार खरेदी केल्यानंतर सांगितले की, मर्सिडीज कार घेणे हे माझे लहानपणापासूनचे स्वप्न होते. आज हे स्वप्न पूर्ण झाल्याने मी खूप आनंदी आहे. उनाडकटने ट्विटरवर पोस्ट केलेल्या फोटो आणि व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले,
Ever since I was a kid, i used to dream about owning a Mercedes and going on road trips with my beloved.. that dream came true yesterday! We bought it, we own A Merc!
To all those who dream – keep visualising & keep working for it, cos dreams do come true! ❤️???? pic.twitter.com/uZnLYy1UwK
— Jaydev Unadkat (@JUnadkat) September 2, 2022
‘मी लहान असल्यापासून मर्सिडीज कार खरेदी करणे आणि माझ्या प्रियजनांसोबत रोड ट्रिपला जाणे हे माझे स्वप्न होते. काल माझे हे स्वप्न पूर्ण झाले. आता आमच्याकडे मर्सिडीज आहे. मी त्या सर्व लोकांना सांगू इच्छितो जे स्वप्न पाहतात. स्वप्नांसाठी काम करत राहा. कारण स्वप्ने सत्यात उतरतात.”
जयदेव याला मागील चार वर्षात आयपीएलमधून बक्कळ कमाई झाली आहे. 2018 मध्ये, उनाडकतला तब्बल 11.50 कोटी रुपयांच्या किमतीत राजस्थान रॉयल्सने आपल्या संघात सामील केले होते. पुढच्या हंगामात राजस्थानने त्याला रिलीज केल्यानंतर पुन्हा 8.40 कोटी रुपयांना विकत घेतले. यानंतर, तो पुढील दोन हंगामात राजस्थानमध्येच राहिला. यावेळी त्याला प्रत्येक हंगामात तीन कोटी रुपये मिळाले. त्याचवेळी, यावर्षी झालेल्या मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने त्याला 1.30 कोटी रुपयांना खरेदी केले होते. उनाडकतने 91 आयपीएल सामन्यात 91 बळी घेतले आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
भारताच्या पठ्ठ्याने न्यूझीलंडविरुद्ध झळकावले शानदार शतक! 400 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची दमदार सुरुवात
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचे रवी चमकणार! प्लेइंग 11मध्ये होणार ‘हे’ बदल
विरुष्काचा फोटो वॉर्नरची कमेंट आणि ट्रोलिंग नंतरचं स्पष्टीकरण! वाचा काय आहे प्रकरण






