भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि बुधवारी (07 जून) आपला 50 वा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ आमने सामने होते. उभय संघांतील ही लढत रोहितसाठी खास होतीच. पण विरोधी संघाचा कर्णधार पॅट कमिन्स याच्यासाठीही हा सामना विशेष म्हणता येईल. रोहितप्रमाणेच पॅट कमिन्सने देखील आपल्या कसोटी कारकिर्दीतील महत्वाचा टप्पा या सामन्यात पार केला.
रोहित शर्मा (Rohit Sharma) पॅट कमिन्स (Pat Cummins) या दोन्ही दिग्गजांनी बुधवारी आपला 50 वा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात आगमन केले. जागतिक कसोटी अजिंक्यपद 2021-23चा अंतिम सामना लंडनच्या द ओव्हल स्टेडियमवर खेळला जात आहे. पहिल्या दिवशी रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. परिणामी द ओव्हलच्या ग्रीन टॉप खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियन संघ प्रथम फलंदाजीसाठी आला.
दरम्यान, नोव्हेंबर 2021 मध्ये पॅट कमिन्सला ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी नियुक्त करण्यात आले होते. टिम पेनला संघाचे कर्णधारपद सोडावे लागल्यामुळे कमिन्सने ही जबाबदारी स्वीकारली. कमिन्सच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने खेळलेल्या 15 सामन्यांपैकी 8 सामने जिंकले आहेत. तीन सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाला पराभव स्वीकारावा लागला, तर चार सामने अनिर्णित राहिले आहेत. कमिन्सच्या एकंदरीत कसोटी कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने आतापर्यंत खेळलेल्या 49 सामन्यांमध्ये 217 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यानत त्याची इकॉनॉमी 2.73 राहिली, तर सरासरी 21.50 राहिली आहे.
दुसरीकडे भारतीय कर्णधार रोहितच्या कसोटी कारकिर्दीवर नजर टाकली, तर त्याने 49 सामन्यांमध्ये 3379 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 45.66 होती, तरत स्ट्राईक रेट 55.94 चा राहिला आहे. डब्ल्यूटीसीच्या या अंतिम सामन्यात चाहत्यांना रोहितकडून एका मोठ्या खेळीची अपेक्षा आहे, जी मागच्या मोठ्या काळापासून रोहित करू शकला नाहीये.
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर ऑस्ट्रेलियन संघाला सलामीवीर उस्मान ख्वाजा () याच्या रूपात पहिला झटका बसला. ख्वाजाने 10 चेंडूत एकही धाव नकरा मोहम्मद सिराजच्या चेंडूवर यष्टीरक्षक केएस भरतच्या हातात झेल दिला. संघाची धावसंख्या 2 असताना ऑस्ट्रेलियाने ख्वाजाच्या रूपात पहिली विकेट गमावली. (Aussie Captain Pat Cummins Also Playing 50th Test Along With Indian Skipper Rohit Sharma)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
BCCI Ireland: वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती, संजू सॅमसन कर्णधार तर दिसतील ‘हे’ 10 नवीन चेहरे
ओडिसा रेल्वे अपघातग्रस्तांना WTC फायनलमध्ये वाहिली गेली श्रद्धांजली, भारतासह ऑस्ट्रेलियन संघानेही व्यक्त केला शोक