वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेचे साखळी सामने संपले असून आता बादफेरीतील सामने खेळायचे बाकी आहेत. यातील दुसरा उपांत्य सामना 16 नोव्हेंबर रोजी कोलकाताच्या इडन गार्डन्स मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ आमने-सामने असणार आहेत. अशात या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार पॅट कमिन्स आयपीएल 2024 स्पर्धेत खेळण्याविषयी व्यक्त झाला आहे. त्याने मोठा खुलासा करत सांगितले आहे की, तो आयपीएलमध्ये खेळणार की नाही.
पॅट कमिन्स (Pat Cummins) याच्यानुसार, त्याला आयपीएल 2024 (IPL 2024) लिलावाचा भाग व्हायचा आहे. तसेच, पुढील हंगामही खेळायचा आहे. कमिन्सने आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेतून आपले नाव मागे घेतले होते. कारण, त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी स्वत:ला रिफ्रेश ठेवायचे होत. कमिन्सविषयी बोलायचं झालं, तर तो आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाचा भाग होता. आयपीएल 2022 स्पर्धेतील काही सामन्यात त्याने शानदार प्रदर्शनही केले होते. मात्र, त्याला 2023 स्पर्धेत खेळता आले नव्हते. अशात आता त्याने आयपीएल 2024 स्पर्धेत खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
काय म्हणाला कमिन्स?
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विश्वचषक 2023 स्पर्धेतील उपांत्य सामन्यात भिडण्यापूर्वी कमिन्सने आयपीएलविषयी भाष्य केले. तो म्हणाला की, “मला वाटते की, मी जास्त टी20 क्रिकेट खेळलो नाहीये आणि अजूनही माझे सर्वोत्तम टी20 क्रिकेटही खेळलो नाहीये. मी खूपच जास्त उत्साही आहे. कदाचित पुढील वर्षी मी आयपीएलच्या लिलावात जाईल आणि टी20 विश्वचषकापूर्वी काही शानदार टी20 सामने खेळण्याचा प्रयत्न करेल. आशा आहे की, मी टी20 विश्वचषकात ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व करेल.”
Pat Cummins confirms he'll be entering the IPL 2024 auction. pic.twitter.com/IBcl9TPdDg
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 14, 2023
आयपीएल 2024 लिलावाची तारीख
आयपीएल 2024 स्पर्धेच्या लिलावाची तारीख आधीच जाहीर झाली आहे. आगामी हंगामाचा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबईत होईल. यावेळी लिलावात अनेक दिग्गज खेळाडू दिसू शकतात. टी20 विश्वचषक पाहता प्रत्येकजण या स्पर्धेत खेळण्यासाठी उत्सुक असेल. (aussie captain pat cummins wants to play in ipl 2024 before t20 world cup know here)
हेही वाचा-
ब्रेकिंग! वर्ल्डकप 2023 सेमीफायनल अन् फायनलसाठीच्या राखीव दिवसाबाबत मोठी अपडेट, लगेच वाचा
वर्ल्डकपमधून बाहेर पडूनही ‘हे’ संघ मालामाल, ‘एवढ्या’ लाखांची केली कमाई; पाहा Semi Finalची Prize Money