---Advertisement---

वर्ल्डकप 2023 सेमीफायनल अन् फायनलसाठीच्या राखीव दिवसाबाबत मोठी अपडेट, लगेच वाचा

CWC-23
---Advertisement---

मागील महिन्यात 5 ऑक्टोबर रोजी सुरू झालेला क्रिकेटचा महाकुंभमेळा अर्थातच आयसीसी वनडे विश्वचषक 2023 अखेरच्या टप्प्यात पोहोचला आहे. स्पर्धेचे 45 साखळी सामने पार पडले आहेत. अशात स्पर्धेचे बादफेरीतील 3 सामने उरले आहेत. या सामन्यांनंतर विश्वचषक विजेत्या संघाचे नाव संपूर्ण जगाला माहिती पडेल. अशात उपांत्य सामन्यांना सुरुवात होण्यापूर्वी आयसीसीकडून मोठी अपडेट समोर आली आहे.

कधी होणार सामने?
वनडे विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेतील दोन उपांत्य सामन्यांपैकी पहिला सामना 15 नोव्हेंबर रोजी वानखेडे स्टेडिअम (Wankhede Stadium) येथे खेळला जाईल. या सामन्यात भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघ आमने-सामने असणार आहेत. तसेच, स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया (South Africa vs Australia) संघात कोलकाताच्या इडन गार्डन्स (Eden Gardens) मैदानावर खेळला जाणार आहे. या बादफेरीतील तीन सामन्यांबाबत मोठी बातमी समोर येत आहे.

https://twitter.com/ICC/status/1724260881456824766

राखीव दिवस
क्रिकेटप्रेमी या बातमीने नक्कीच आनंदी होतील. खरं तर, आयसीसीने या उपांत्य आणि अंतिम सामन्यांसाठी राखीव दिवस (Reserve Day) ठेवण्याची व्यवस्था केली आहे. अशात उपांत्य किंवा अंतिम सामन्यादरम्यान पाऊस पडला आणि सामना पूर्ण होऊ शकला नाही, तर सामना दुसऱ्या दिवशी खेळला जाईल.

राखीव दिवशी पाऊस पडला तर…?
राखीव दिवशीही सामना पूर्ण झाला नाही, आणि सलग दोन दिवस पाऊस पडला, तर अशा स्थितीत पॉईंट्स टेबलमध्ये चांगल्या स्थितीत असणारा संघाला फायदा होईल. तसेच, तो संघ अंतिम सामन्यासाठी पात्र होईल. उदाहरण म्हणून पाहूयात, जर भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील उपांत्य सामना पावसामुळे खेळला गेला नाही, तर अशा स्थितीत पॉईंट्स टेबलमधील अव्वलस्थानी असणारा भारतीय संघ अंतिम सामन्यासाठी क्वालिफाय करेल. तसेच, न्यूझीलंड संघ चौथ्या क्रमांकावर असल्याने त्यांना स्पर्धेबाहेर पडावे लागू शकते. (india vs new zealand 1st semi final icc confirms the reserve days for semis and final cwc 2023)

हेही वाचा-
वर्ल्डकपमधून बाहेर पडूनही ‘हे’ संघ मालामाल, ‘एवढ्या’ लाखांची केली कमाई; पाहा Semi Finalची Prize Money
सेमीफायनलपूर्वी विराटला राग अनावर! लेक वामिकासाठी पॅपराजींवरच तापला, म्हणाला, ‘लेकीला…’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---