---Advertisement---

ऑस्ट्रेलियन कोचही झाला सूर्याचा फॅन! अशा शब्दांत केले सूर्यकुमारचे कौतुक

On: सोमवार, सप्टेंबर 26, 2022 4:56 PM
suryakumar yadav
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील अखेरचा सामना हैदराबाद येथे खेळला गेला. रोमांचक ठरलेल्या या सामन्यात भारतीय संघाने सहा गडी राखून विजय मिळवत मालिका 2-1 अशी आपल्या नावे केली. या सामन्यात सूर्यकुमार यादवने वादळी फलंदाजी करत भारताला विजयाच्या दिशेने नेले. त्याच्या या कामगिरीनंतर ऑस्ट्रेलियन संघाचे मुख्य प्रशिक्षक ऍण्ड्रू मॅकडोनाल्ड यांनी देखील सूर्यकुमार यादवचे तोंडभरून कौतुक केले.

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मैदानावर उतरलेल्या सूर्यकुमार यादवने विराटसोबत 104 धावांची भागीदारी केली. त्याने 36 चेंडूवर 5 चौकार व 5 षटकारांच्या मदतीने 69 धावांची धडाकेबाज खेळी केली. मालिकेतील पहिल्या सामन्यातही त्याने 46 धावांची आक्रमक खेळी केली होती.

ऑस्ट्रेलियन संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेल्या ऍण्ड्रू मॅकडोनाल्ड यांनी सामन्यानंतर सूर्यकुमारची स्तुती करताना म्हटले की, “सूर्यकुमार यादव आज उत्कृष्ट होता आणि तो विश्वचषकात धोकादायक ठरेल. त्याने तो काय करू शकतो हे दाखवून दिले.”
याशिवाय अक्षर पटेलबद्दल बोलताना ते म्हणाले,
“अक्षर पटेलसाठी ही एक जबरदस्त मालिका होती. जडेजा बाहेर पडल्याने प्रत्येकाला वाटले की ही भारतासाठी थोडी कमजोरी ठरू शकते. परंतु भारताने दुसरा पर्याय शोधून काढला आहे.”

या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. ऑस्ट्रेलियाने कॅमेरून ग्रीन (52) आणि टीम डेविड (54) यांच्या अर्धशतकाच्या बळावर 7 गडी गमावत 186 धावा केल्या. यावेळी भारताकडून अक्षर पटेल याने सर्वाधिक 3 बळी मिळवले. प्रत्युत्तरात, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांच्या अर्धशतकांमुळे भारताने एक चेंडू राखून विजय मिळवला. सूर्यकुमार यादव याला सामनावीर तर अक्षर पटेलला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी-20 मालिका गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाला नुकसान! आयसीसी रँकिंगमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर
INDvsAUS: विराट-रोहितचे भन्नाट सेलेब्रेशन, व्हिडिओ होतोयं तुफान व्हायरल
INDvsAUS: ‘किंग कोहली’ने पार केली ‘द वॉल’! फिफ्टी करताच केला ‘हा’ मोठा पराक्रम नावावर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---