बलाढ्य ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा आयसीसी स्पर्धांमध्ये आपला दम दाखवून दिला. ऑस्ट्रेलिया जागतिक कसोटी अजिंक्यपद 2023 स्पर्धेचा अंतिम सामना जिंकण्यात यशस्वी झाला. ऑस्ट्रेलियाने भारताला 209 धावांनी पराभूत करत हा कारनामा केला. तसेच, त्यांनी पहिली वहिली डब्ल्यूटीसी अंतिम सामन्याची ट्रॉफी उंचावली. आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची ही त्यांची नववी वेळ होती. या सामन्यात वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांची मोठी विकेट आपल्या नावे केली. अशातच आता आयपीएल स्पर्धेपासून नेहमी अंतर राखणाऱ्या स्टार्कने भारतीय प्रतिष्ठित टी20 लीगबद्दल मोठे विधान केले आहे.
काय म्हणाला स्टार्क?
ऑस्ट्रेलिया संघाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क (Mitchell Starc) याने माध्यमांशी बोलताना आयपीएल (IPL) स्पर्धेत न खेळण्याविषयी मत मांडले. तो म्हणाला की, “मला आयपीएलमध्ये खेळायला मजा येते, अगदी त्याचप्रकारे, ज्याप्रकारे मी दहा वर्षांपूर्वी यॉर्कशायरसाठी खेळायचो. मात्र, ऑस्ट्रेलियाकडून खेळणे नेहमीच माझ्यासाठी अग्रस्थानी राहिले आहे. मला कोणत्याची गोष्टीचा पश्चाताप नाहीये. पैसा येत जात राहतो, पण मला आनंद आहे की, मला अशी संधी मिळत आहे.”
आयपीएलमध्ये खेळून आनंद होईल
वेगवान गोलंदाज स्टार्क पुढे बोलताना म्हणाला की, “100हून अधिक वर्षांच्या कसोटी क्रिकेट इतिहासात ऑस्ट्रेलियाकडून खेळणारे 500हून कमी खेळाडू राहिले आहेत. अशा यादीत माझा समावेश होणे, हे माझ्यासाठी खूपच खास आहे. मला आयपीएलमध्ये खेळून आनंदच होईल, पण दीर्घ काळापासून माझे ध्येय हेच राहिले आहे की, मी ऑस्ट्रेलियाकडून खेळत आपले सर्वोत्तम देऊ शकेल. मग तो कोणताही क्रिकेटप्रकार असो.”
आयपीएलमध्येही खेळलाय स्टार्क
मिचेल स्टार्क अलीकडे आयपीएलकडे कानाडोळा करत असला, तरीही तो आयपीएल खेळलाच नाही, असे काही नाहीये. त्याने या स्पर्धेत आतापर्यंत एकूण 27 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 34 विकेट्सही चटकावल्या आहेत. स्टार्कने त्याचा अखेरचा आयपीएल हंगाम रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाकडून 2015मध्ये खेळला होता. (aussie pacer mitchell starc said that playing for australia will be his top priority ipl wtc final 2023)
महत्वाच्या बातम्या-
बापरे बाप! 8 फोर…4 सिक्सेस, 21 वर्षीय फलंदाजाने दाखवला IPL फायनलचा दम, TNPLमध्ये झंझावाती बॅटिंग
चेन्नईच्या शिलेदाराने केले गुपचूप लग्न; पण मित्राला बोलावून फसला आणि फोटो मीडियात पोहोचला