क्रिकेटचा महाकुंभमेळा म्हणजेच वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा जसजशी पुढे जात आहे, तसतशी स्पर्धेची रंगत वाढत आहे. स्पर्धेतील आतापर्यंत 31 सामने पार पडले आहेत. रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघ पॉईंट्स टेबलमध्ये राज्य करत आहे. भारत पॉईंट्स टेबलमध्ये अव्वलस्थानी विराजमान आहे. तसेच, ऑस्ट्रेलिया संघही जुन्या लयीत परतला आहे. दोन्ही संघ स्पर्धेत शानदार प्रदर्शन करत आहेत. अशात ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू नेथन लायन याने मोठी भविष्यवाणी केली आहे. त्याने स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील दोन संघांची नावे सांगितली आहेत.
काय म्हणाला लायन?
ऑस्ट्रेलियासाठी 153 आंतरराष्ट्रीय सामने खेळताना 526 विकेट्स घेणारा 35 वर्षीय फिरकीपटू नेथन लायन (Nathan Lyon) याने मोठे विधान केले. तो म्हणाला की, “प्रामाणिकपणे सांगतो, मला वाटते की, भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात अंतिम सामना होईल. भारतीय संघ माझा आवडता संघ आहे. स्पर्धेत ते शानदार प्रदर्शन करत आहेत.”
पुढे बोलताना लायन म्हणाला की, “दक्षिण आफ्रिका संघही आपल्या मजबूत फलंदाजी क्रमाच्या जोरावर विरोधी संघासाठी धोका ठरू शकतो. भारतीय संघावर संपूर्ण देशाच्या अपेक्षांचा दबाव आहे.” तो असेही म्हणाला की, “त्यांचे चाहते क्रिकेटसाठी वेडे असतात. त्यांना विजयाशिवाय इतर काहीच मान्य नसते. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाची आकडेवारी चांगली आहे. ते पूर्ण क्षमतेसह विजयासाठी जोर लावतील.”
गुणतालिकेत भारत आणि ऑस्ट्रेलियाची स्थिती
विश्वचषक 2023 स्पर्धेतील 31 सामने पार पडल्यानंतर भारतीय संघ पॉईंट्स टेबलमध्ये 12 गुण आणि +1.405 नेट रनरेटच्या आधारे अव्वलस्थानी आहेत. तसेच, ऑस्ट्रेलिया संघ 6 सामन्यातील 4 विजयांसह 8 गुण आणि +0.970 नेट रनरेटसह चौथ्या स्थानी आहे. विशेष म्हणजे, भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ आपला पहिला सामना एकमेकांविरुद्धच खेळले होते. त्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 6 विकेट्सने पराभूत केले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धही 134 धावांनी पराभव पत्करला होता. मात्र, पुढील चारही सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले. अशात नेथन लायनची भविष्यवाणी खरी ठरते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (aussie spinner india vs australia odi world cup 2023 final)
हेही वाचा-
बांगलादेशचा धुव्वा उडवत पाकिस्तानने Points Tableमध्ये घेतली गरुडझेप, पटकावला ‘हा’ क्रमांक
‘आम्हाला माहिती होतं, तो जर टिकला…’, बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर बाबरने ‘या’ खेळाडूवर उधळली स्तुतीसुमने