टी20 विश्वचषक 2024 च्या सुपर-8 मधील चाैथ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश यांच्यात सामना झाला. हा सामना वेस्ट इंडिज मधील अँटिग्वा येथे रंगला. सुपर-8 मधील दोन्ही संघाचा हा पहिला सामना होता. या सामन्यात कांगारुनी बांग्लादेशवर 28 धावांनी विजय मिळवला आहे. पावसाच्या व्यतत्यामुळे ऑस्ट्रेलियाने हा सामना डकवर्थ लुईस (DLS) पध्दतीने जिंकला.
ऑस्ट्रेलिया फलंदाजी करताना पाऊस आल्याने सामना थांबवावा लागला. पाऊसाचा जोर वाढतच असल्याने सामन्याला पुन्हा सुरुवात करता आली नाही. यादरम्यान ऑस्ट्रेलियन संघाने 11.2 षटकात 100 धावा केल्या होत्या त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. डकवर्थ लुईस नियमानूसार ऑस्ट्रेलिया बांग्लादेशच्या 28 धावांनी पुढे होती. त्यामुळे अंमपायरच्याा निर्णयामुळे डकवर्थ लुईस पध्दतीने ऑस्ट्रेलियाने हा सामना आपल्या नावे केला.
तत्तपूर्वी सामन्यात ऑस्ट्रेलियाने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार मिचेल मार्शचा निर्णय सार्थ ठरवत कांगारु गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. पहिल्यांदा फलंदाजी करण्यात उतरललेल्या बांग्लादेश संघाची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर तनजीद हसनला मिचेल स्टर्कने शून्य धावसंख्येवर तंबूत पाठवले. विकेटकीपर फलंदाज लिटन दास देखील 16 धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार शांतो आणि तौहीद हृदोय यांच्या फलंदाजीच्या जोरावर बांग्लादेशने 140 धावांचे लक्ष्य कांगारु समोर ठेवले. गोलंदाजीत ऑस्ट्रेलिया कडून पॅट कमिन्सने हॅट्ट्रीक घेऊन इतिहास रचला. तर फिरकीपटू झम्पाने 2 विकेट्स मिळवल्या.
यानंतर धावांचा पाठलाग करायाला आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या सलामी जोडीने 6.5 षटकात 65 धावांची आक्रमक भागादारी करत सामना आपल्या पारड्यात झुकवला. या दरम्यान ट्रेव्हिस हेड (31) आणि कर्णधार मिचेल मार्शला (1) रिशाद हुसेनने दोघांना बाद करुन बांग्लादेशला सामन्यात आणले. पण आचनक पावसाला सुरुवात झाल्याने ऑस्ट्रेलियाने डकवर्थ लुईस पद्धतीने 28 धावांनी जिंकाला. सलामीवीर डेव्हिड वार्नर 35 चेंडूत 53 धावां करुन नाबाद राहिला.
महत्तवाच्या बातम्या-
क्रिकेट विश्वचषकात मिचेल स्टार्कचा दबदबा! या बाबतीत टाकलं सर्व दिग्गजांना मागे
विराट कोहलीचा विश्वविक्रम धोक्यात, सूर्यकुमार यादवनं अवघ्या 64 सामन्यांत रचला इतिहास!
टी20 विश्वचषक 2024 मधील पहिली हॅट्ट्रिक! ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांग्लादेश सामन्यात घडला इतिहास