यावर्षी इंग्लंडच्या खेळाडूंसाठी आणि संघासाठी ऑस्ट्रेलिया दौरा चांगला राहिला नाही. ऑस्ट्रेलियाचा पुरुष संघ डिसेंबर-जानेवारी महिन्यात इंग्लंडच्या दौऱ्यावर होता. तेव्हा तेथे संघाला ऍशेस कसोटी मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर इंग्लंडचा महिला संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला आहे आणि या दोन संघांमध्ये सर्व प्रकारांची ऍशेस मालिका खेळली गेली. यातही इंग्लंडचा पराभव झाला. मंगळवारी (८ फेब्रुवारी) ऑस्ट्रेलियाने मालिकेच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा ८ गडी राखून पराभव करून मालिकेत शानदार विजय मिळवला.
इंग्लंड-ऑस्ट्रलिया संघांच्या महिला संघांमध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडची नवोदित एम्मा लॅम्ब ० वर बाद झाली. तर कर्णधार हीथर नाइट ९ धावांवर बाद झाली. टॅमी ब्युमॉन्टने ५० आणि नॅट सिव्हरने ४६ धावा केल्या. यानंतर इंग्लंडच्या विकेट पडत राहिल्या. इंग्लंडने त्यांच्या शेवटच्या सात विकेट केवळ ३९ धावांत गमावल्या आणि इंग्लंड १६३ धावांवर सर्वबाद झाला.
या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रोलियाची कर्णधार मेग लॅनिंगच्या नाबाद ५७ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ३७ व्या षटकात फक्त २ विकेट गमावून हे लक्ष्य गाठले. लॅनिंगशिवाय सलामीवीर एलिसा हिलीनेही ऑस्ट्रेलियासाठी ४२ धावांची खेळी खेळून दमदार सुरुवात केली होती. या पराभवासह इंग्लंडने तिन्ही एकदिवसीय सामने गमावले आहेत. इंग्लंडला मालिकेतील ७ पैकी ४ सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. ऑस्ट्रेलियाची गोलंदाज सदरलँडने तिच्या नऊ षटकांत ३१ धावा देऊन चार बळी घेतले, ज्यासाठी तिला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पुरुष संघ, महिला संघ आणि ‘अ’ संघांसह एकूण १९ सामने खेळले गेले, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियन संघांनी १४ जिंकले, तर इंग्लंडला एकही विजय मिळाला नाही. ५ सामने अनिर्णित राहिले किंवा पावसामुळे रद्द झाले.
ऑस्ट्रेलिया महिला संघाने ऍशेस २०२२ अंतर्गत खेळली गेलेली तीन सामन्यांची टी२० मालिका १-० ने जिंकली. यानंतर एकमेव कसोटी अनिर्णित राहिली. यासोबतच ऑस्ट्रेलियाने तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका ३-० ने जिंकली. ऑस्ट्रेलिया पुरुष संघाने ४-० ऍशेस मालिका नावावर केली होती.
महत्वाच्या बातम्या-
”यावेळी प्लेसिसमागे सर्व संघ धावणार”; भारताच्या प्रमुख खेळाडूची भविष्यवाणी (mahasports.in)