भारतीय संघाचा (TEAM INDIA) दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन (ravichandran ashwin) याने आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावाविषयी एक भविष्यवाणी केली आहे. दक्षिण अफ्रिकेचा महान फलंदाज फाफ डू प्लेसिस आयपीएलमध्ये यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जसाठी (CSK) खेळत आला आहे. परंतु पुढच्या हंगामासाठी सीएसकेने त्याला संघात रिटेन केले नाहीये. परंतु अश्विनच्या मते, सीएसके मेगा लिलावात डू प्लेसिसवर मोठी बोली लावेल.
मागच्या हंगामात डू प्लेसिसने सीएसकेसाठी खूप धावा केल्या होत्या. अशात पुढच्या हंगामासाठी सीएसकेचा प्रयत्न असेल की, त्याला पुन्हा एकदा संघात सामील केले जावे. आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना अश्विन म्हणाला की, “मागच्या वर्षी चेन्नईला डू प्लेसिस १.५ करोड रुपयांमध्ये मिळाला होता. परंतु यावर्षी त्याच्यासोबत अशाप्रकारची घटना होताना दिसणार नाही. सीएसकेच्या चाहत्यांच्या मनातील खेळाडूंमध्ये डू प्लेसिस नक्कीच असेल. जर यावर्षी सीएसके त्याला खरेदी करू इच्छित असेल, तर त्यांना नक्कीच मागच्या वेळेपेक्षा खूप जास्त पैसा खर्च करण्यासाठी तयार राहिले पाहिजे. माझ्या मते डू प्लेसिसला खूप मागणी असणार आहे.”
मागच्या हंगामातील डू प्लेसिसिच्या प्रदर्शनाचा विचार केला, तर सलामीवीराच्या रूपात खेळताना त्याने सीएसकेसाठी खूपच उत्कृष्ट फलंदाजी केली होती. कर्णधार एमएस धोनीलाही त्याचे महत्व चांगल्या प्रकारे माहिती आहे. अशात सीएसके त्याला संघात सामील करण्यासाठी नक्कीच मोठी बोली लावेल. आता फक्त हेच पाहायचे बाकी आहे की, सीएसके त्यांच्या अनुभवी फलंदाजाला संघात पुन्हा सामील करण्यासाठी किती पैसा खर्च करण्याची तयारी दाखवते.
दरम्यान, पुढचा हंगाम सुरू होण्यापूर्वी प्रत्येक संघाला चार खेळाडू रिटेन करण्याची संधी मिळाली होती आणि उरलेले सर्व खेळाडू हे मेगा लिलावाचा भाग असणार आहेत. चेन्नई सुपर किंग्जनेही चार खेळाडूंना संघात रिटेने केले आणि इतर सर्वांना लिलावात सहभागी व्हावे लागले. चेन्नईने रिटेन केलेल्या खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजा (१६ करोड), एमएस धोनी (१२ करोड), मोईन अली (८ करोड), ऋतुराज गायकवाड (६ करोड) यांचा समावेश आहे. आता मेगा लिलावातही संघ पैशाचा पाऊस पाडण्यासाठी तयार आहे.
महत्वाच्या बातम्या –
रणजी ट्रॉफी २०२२ साठी बीसीसीआयची कडक नियमावली; घेतले गेले महत्त्वाचे निर्णय
ऑस्ट्रेलियन दिग्गजाशी तुलना केल्यानंतर सूर्या म्हणतोय…
तो परत आला! तब्बल ९ वर्षांनंतर श्रीसंत उतरणार रणजीच्या रणांगणात