इंग्लंडविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाची वरचढ पाहायला मिळत आहे. लीड्स येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 68 धावांनी पराभव करत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघ 44.3 षटकांत 270 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संपूर्ण संघ 40.2 षटकांत 202 धावांत सर्वबाद झाला. ॲलेक्स कॅरीच्या शानदार कामगिरीमुळे त्याला (74) सामनावीर पुरस्कार देण्यात आले.
कर्णधार हॅरी ब्रूकने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात खेळताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली होती. मॅथ्यू शॉर्ट आणि ट्रॅव्हिस हेड यांनी पहिल्या विकेटसाठी 46 धावा जोडल्या. हेड (29) बाद झाल्यानंतर कर्णधार मिचेल मार्श चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. त्याने 59 चेंडूत 61 धावा केल्या. ज्यात सहा चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. तर स्टीव्ह स्मिथ (4) आणि मार्नस लॅबुशेन (19) यांनी निराशा केली. एकवेळ 155 धावांवर कांगारू संघाचे पाच प्रमुख फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते. यानंतर ॲलेक्स कॅरीने मोर्चा सांभाळत 67 चेंडूत 74 धावांची शानदार खेळी खेळली. ज्यात 8 चौकार आणि 3 षटकारांचा सामवेश होता. कॅरीला ऑली स्टोनने आपला बळी बनवले. ॲरॉन हार्डीने 23 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलिया पूर्ण षटके खेळू शकला नाही आणि 44.4 षटकात 270 धावांवर सर्वबाद झाला. इंग्लंडकडून ब्रेडन क्रॉसने सर्वाधिक तीन बळी घेतले.
धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंड संघाची निराशाजनक सुरुवात झाली. यजमान संघाच्या एकाही फलंदाजाला 50 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. इंग्लंड संघाची सुरुवात खूपच खराब झाली. फिल सॉल्ट (12), बेन डकेट (32), विल जॅक (0), हॅरी ब्रूक (4) आणि लियाम लिव्हिंगस्टोन (0) 65 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले. इथून ऑस्ट्रेलियाचा विजय जवळपास निश्चित झाला. इंग्लंडकडून विकेटकीपर फलंदाज जेमी स्मिथ (49) याने सर्वाधिक धावा केल्या. मिचेल स्टार्कच्या घातक गोलंदाजीसमोर इंग्लंडचा संपूर्ण संघ 40.2 षटकात 202 धावांवर गारद झाला. ऑस्ट्रेलियाने 68 धावांनी सहज विजय मिळवला. स्टार्क तीन विकेट घेण्यात यशस्वी ठरला.
ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय सामन्यात सलग 14 वा विजय नोंदवला.
Most consecutive wins in ODIs:
Australia – 21 (2003).
Australia – 14* (2023-24). pic.twitter.com/EnW5lO4o7b
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 21, 2024
ऑस्ट्रेलियाचा वनडेमध्ये (ऑक्टोबर 2023 ते सप्टेंबर 2024 दरम्यान) सलग 14 वा विजय आहे. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक सलग सामने जिंकण्याच्या बाबतीत ऑस्ट्रेलिया आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाच पहिल्या क्रमांकावर आहे. जानेवारी 2003 ते मे 2003 या कालावधीत कांगारू संघाने सलग 21 सामने जिंकले होते.
हेही वाचा-
‘मी त्याला पहिले शतक करताना पाहिले’, पंतच्या जोडीदाराने एका ओळीत सांगितली पुनरागमनाची कहाणी
IND vs BAN: शाकिबच्या विकेट्सनंतर कोहलीचा शानदार डान्स, VIDEO व्हायरल
एका बापाला आणखी काय हवं! शुबमनला शतक करताना पाहून वडिलांचा आनंद गगनात मावेना