गेल्या कित्येक महिन्यांपासून आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेची आतुरतेने वाट पाहिली जात होती. अखेर ही स्पर्धा संपन्न झाली असून क्रिकेटविश्वाला नवा विश्वविजेता संघ मिळाला आहे. आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (१४ नोव्हेंबर) पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने होते. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने ८ गडी राखून जोरदार विजय मिळवला आणि पहिले वहिले जेतेपद आपल्या नावावर केले. या विजयानंतर ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडूंनी ड्रेसिंग रूममध्ये जोरदार जल्लोष साजरा केला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
विश्वचषक स्पर्धेत विजय मिळवणे हे प्रत्येक संघाचे आणि खेळाडूचे स्वप्न असते. त्यातही तब्बल १४ वर्षे प्रतीक्षा केल्यानंतर विजय मिळवणे ही खूप मोठी गोष्ट असते. ज्यामुळे आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचे जेतेपद मिळवल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी ड्रेसिंग रूममध्ये हटके स्टाईलमध्ये सेलीब्रेशन केले.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ऑस्ट्रेलियन खेळाडू डांस करताना दिसून येत आहेत. ज्यामध्ये ॲडम झम्पा, मार्कस स्टोइनिस, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ आणि संपूर्ण संघ शॅंपियन उडवून आणि नृत्य करून जल्लोष साजरा करताना दिसून येत आहेत. हा व्हिडिओ आयसीसीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यावर कॅप्शन म्हणून त्यांनी, ‘गाणं बंद करू नका.” असं लिहिलं आहे. तसेच दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये मार्कस स्टोइनिस बुटात बियर टाकून पित असताना दिसून येत आहे.
तसेच ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेल्या अंतिम सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंड संघाकडून प्रथम फलंदाजी करताना केन विलियमसनने सर्वाधिक ८५ धावांची खेळी केली. तर मार्टिन गप्टीलने २८ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर न्यूझीलंड संघाला २० षटक अखेर ४ बाद १७२ धावा करण्यात यश आले होते.
Never turn off the music! 🤣#T20WorldCup pic.twitter.com/7KDiYY3qn9
— ICC (@ICC) November 15, 2021
How's your Monday going? 😅#T20WorldCup pic.twitter.com/Fdaf0rxUiV
— ICC (@ICC) November 15, 2021
ऑस्ट्रेलिया संघाचा यशस्वी पाठलाग
या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाकडून मिचेल मार्शने नाबाद ७७ धावांची तर डेविड वॉर्नरने ५३ धावांची खेळी करत ऑस्ट्रेलिया संघाला ८ गडी राखून विजय मिळवून दिला.
महत्वाच्या बातम्या –
‘देशाला अभिमान वाटावा यासाठी परिश्रम करत राहील’, अर्जुन पुरस्कार मिळाल्यानंतर शिखर धवन झाला व्यक्त
बऱ्याच काळापासून कसोटी संघातून बाहेर असलेल्या ‘या’ ४ खेळाडूंना न्यूझीलंडविरुद्ध द्रविड देऊ शकतो संधी
हसन अलीची सेमीफायनलमधील चुकीबद्दल दिलगिरी; म्हणाला, ‘माझ्यावर खूप निराश होऊ नका…’