कसोटी क्रिकेटमधील नवे प्रतिस्पर्धी म्हणून ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या संघांकडे पाहिले जाते. दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ नुकताच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आला असून, उभय संघांमध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. ब्रिस्बेन येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात चाहत्यांना केवळ दुसऱ्या दिवशी सामन्याचा निकाल पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाने पाहुण्या संघाचा 6 गडी राखून पराभव करत मालिकेत आघाडी मिळवली.
It’s all over at The Gabba, inside two days!
Australia extend their lead at the top of the #WTC23 standings with a six-wicket win 📈
Watch the rest of the #AUSvSA series LIVE on https://t.co/CPDKNxoJ9v with a Full Tour Pass 📺 pic.twitter.com/OmeITaMEDs
— ICC (@ICC) December 18, 2022
ब्रिस्बेन येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात चाहत्यांना संघर्षपूर्ण लढतीची अपेक्षा होती. मात्र, सामन्याच्या दोन्ही दिवसांवर उभय संघांच्या गोलंदाजांचे वर्चस्व राहिले. ऑस्ट्रेलियन कर्णधाराने नाणेफेक जिंकून या सामन्यात प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, स्कॉट बॉलंड या वेगवान त्रिकुटाला फिरकीपटू नॅथन लायनने उत्कृष्ट साथ दिली. त्यामुळे दक्षिण आफ्रिका संघाचा डाव 152 धावांवर संपुष्टात आला. दक्षिण आफ्रिकेसाठी यष्टीरक्षक कायल वेरानेने अर्धशतक झळकावले.
पहिल्याच दिवशी फलंदाजी संधी मिळालेल्या ऑस्ट्रेलियन फलंदाजांना फारशी मोठी धावसंख्या उभारता आली नाही. चांगल्या फॉर्ममध्ये असलेला मध्यफळीतील फलंदाज ट्रेविस हेडने 92 व उपकर्णधार स्टीव्ह स्मिथने 36 धावा केल्याने ऑस्ट्रेलियाने 218 अशी मजल मारली. दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या डावात धैर्याने फलंदाजी करत मोठी धावसंख्या रचण्याची संधी होती.
परंतु, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने अक्षरशा आग ओकणारी गोलंदाजी केल्याने दक्षिण आफ्रिकेचा डाव केवळ 99 धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी मिळालेले 35 धावांचे आव्हान पार करतानाही मोठी कसरत करावी लागली. त्यांनी हे आव्हान पार करताना चार गडी गमावले. हे चारही बळी कगिसो रबाडाने आपल्या नावे केले. तसेच, दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी 19 अवांतर धावा देत ऑस्ट्रेलियाला एक प्रकारे मदत केली. पहिल्या डावात शानदार 92 धावांची खेळी करणारा हेड सामनावीर ठरला. उभय संघातील दुसरा कसोटी सामना 26 डिसेंबरला मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाणार आहे.
(Australia Beat South Africa In Brisbane Test In Just 2 Days)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीला घाबरतो शाहरुख खान! म्हणाला, ‘जेव्हा तो केकेआरविरुद्ध फलंदाजीला येते…’
केवळ 34 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कांगारुंच्या नाकी-नऊ, कागिसो रबाडाने दिले लागोपाठ धक्के