भारत आणि ऑस्ट्रेलिया (India Vs Australia) संघात या वर्षाच्या अखेरिस नोव्हेंबरमध्ये बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) खेळली जाणार आहे. दरम्यान दोन्ही संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका रंगणार आहे. भारतीय संघ गेल्या चार वेळा बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी जिंकत आहे. तत्पूर्वी आगामी मालिका सुरू होण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने (Pat Cummins) भारतीय फलंदाजाबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना पॅट कमिन्स (Pant Cummins) म्हणाला, “पहा, मला वाटते की प्रत्येक संघात एक किंवा दोन खेळाडू असतात जे खेळाला पुढे नेऊ शकतात. तुम्हाला माहीत आहे, आमच्याकडे ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्शसारखे खेळाडू आहेत. जर तुम्ही तुमच्या झोनमध्ये थोडेसे चुकला तर ते गेम ताब्यात घेतील. पण रिषभ पंतसारखा खेळाडू तो रिव्हर्स लॅप खेळू शकतो आणि हा एक अविश्वसनीय शॉट आहे आणि तो त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग आहे.”
पुढे बोलताना पॅट कमिन्स (Pat Cummins) म्हणाला, “मला वाटते की आजकाल काही हास्यास्पद शॉट्स जरा जास्तच सामान्य झाले आहेत, तेव्हा आपल्याला त्याची थोडी जास्त सवय झाली आहे. रिषभ पंत असा खेळाडू आहे ज्याने काही मालिकांवर मोठा प्रभाव पाडला आहे आणि आम्हाला त्याला शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल.”
बॉर्डर गावसकर मालिकेचे पूर्ण वेळापत्रक
पहिली कसोटी: 22-26 नोव्हेंबर, पर्थ
दुसरी कसोटी: 6-10 डिसेंबर, ॲडलेड (दिवस-रात्र कसोटी)
तिसरी कसोटी: 14-18 डिसेंबर, ब्रिस्बेन
चौथी कसोटी: 26-30 डिसेंबर, मेलबर्न
पाचवी कसोटी: 3-7 जानेवारी, सिडनी
महत्त्वाच्या बातम्या-
दुसऱ्या कसोटीपूर्वी संघाला धक्का, वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर; या खेळाडूला मिळाले स्थान
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे टाॅप-5 संघ
“बीसीसीआयकडून शिका”, माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूचा पीसीबीवर हल्लाबोल