भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या बैठकीत इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) बद्दल उर्वरित सामन्याचे नियोजन करण्यात आले. आयपीएलचे उर्वरित सामने संयुक्त अरब अमिराती (युएई) मध्ये होणार असून उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून ते १५ ऑक्टोबरपर्यंत खेळवण्यात येतील. दरम्यान विदेशी खेळाडू उपलब्ध असतील का, याबाबत अजूनही कुठल्याही विदेशी क्रिकेट मंडळाने माहिती दिलेली नाही. (Australia chairman of selectors trevor hohns said he expects the countrys ipl players to forgo the ipl)
आयपीएलचे उर्वरित सामने सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात होणार असून सगळ्याच विदेशी खेळाडूंचे वेळापत्रक हे व्यस्त आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलिया संघाचे मुख्य निवडकर्ता ट्रेवर होन्स यांनी माहिती दिली की, “ऑस्ट्रेलिया संघ पुढील महिन्यात वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान संघासोबत त्रिकोणीय मालिका खेळणार आहे. जर त्रिकोणीय मालिकेचे आणि आयपीएलचे वेळापत्रक जुळून आले, तर येत्या आयपीएल स्पर्धेत ऑस्ट्रेलियन खेळाडू भाग घेऊ शकणार नाहीत. ते आपल्या राष्ट्रीय संघासोबत असतील.”
ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी-२० विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियासाठी ही त्रिकोणीय मालिका खूप महत्त्वाची आहे. जर ही मालिका झाली, तर या मालिकेचे आणि आयपीएलचे वेळापत्रक सारखेच असण्याची दाट शक्यता आहे.
होन्स यांनी स्पष्ट केले की, ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाला खेळाडूंवर विश्वास की, ते सर्वप्रथम राष्ट्रीय संघाचा विचार करतील. क्रिकेट डॉट कॉम डॉट एयूसोबत बोलताना होन्स यांनी सागितलं की, “मी खेळाडूंवर विश्वास ठेवतो की, ते राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आयपीएल सोडतील.”
होन्स यांनी सांगितले की, हे प्रकरण भविष्यात सुधारले जाईल. ते म्हणाले, “आम्ही सध्या या गोष्टींवर अद्याप लक्ष दिले नाही आहे. आणि तसेच खेळाडूंनी सुद्धा या गोष्टीवर काही भाष्य केले नाही.”
होन्स यांनी यावर सुद्धा स्पष्टीकरण दिले की, ज्या खेळाडूंनी वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी संघाच्या बाहेर राहण्याचे ठरवले आहे, त्यातील काही खेळाडूंना येत्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत स्थान मिळणे काठी जाईल.
महत्वाच्या बातम्या-
ट्रेंट बोल्टने रोहित शर्माला आयपीएल दरम्यानच दिली आहे ‘ही’ चेतावणी, आता राहावे लागणार सावध
रोहित शर्माला WTC फायनलपूर्वी व्हीव्हीएस लक्ष्मणचा ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ सल्ला
WTC फायनलसाठी कशी असायला हवी भारताची फलंदाजी क्रमवारी? व्हीव्हीएस लक्ष्मणने दिले ‘हे’ उत्तर