---Advertisement---

टी२० विश्वचषकापूर्वी भारत दौऱ्यावर येणार ऑस्ट्रेलिया, खेळणार टी२० मालिका; पाहा कधी होणार सामने?

Aaron Finch Virat Kohli
---Advertisement---

भारतात सध्या इंडियन प्रीमियर लीग २०२२ची रणधुमाळी सुरू आहे. दरम्यान असे वृत्त येत आहे की, ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ यावर्षी होणाऱ्या टी२० विश्वचषक २०२२पूर्वी भारताचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात ३ सामन्यांची टी२० मालिका (T20 Series) खेळली जाईल. सप्टेंबर महिन्यात ही मालिका होईल. फॉक्स क्रिकेटने यासंदर्भात माहिती दिली आहे. 

ऑस्ट्रेलिया संघ (Australia Team) ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झिम्बाब्वे आणि न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेचे यजमानपद भूषवणार आहे. या मालिकांनंतर सप्टेंबर महिन्यातच ऑस्ट्रेलियाचा संघ ३ सामन्यांच्या टी२० मालिकेसाठी (Australia Tour Of India) भारत दौऱ्यावर येईल. या मालिकेसाठी तारिख आणि ठिकाणांची घोषणा नंतर केली जाईल. या मालिकेद्वारे ऑस्ट्रेलिया संघ आगामी टी२० विश्वचषकासाठी (T20 World Cup 2022) त्यांची तयारी पूर्ण करेल. टी२० विश्वचषक यावर्षीच १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबरदरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. 

भारत- ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकाही होणार आहे 
यावर्षी टी२० मालिका खेळल्यानंतर फेब्रुवारी आणि मार्च २०२३ मध्ये ऑस्ट्रेलिया संघ पुन्हा एकदा भारत दौऱ्यावर (IND vs AUS) येईल. या दौऱ्यात उभय संघ ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळतील. ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामाअंतर्गत खेळली जाईल. ऑस्ट्रेलियाने मागच्या वेळी जेव्हा २०१७ मध्ये कसोटी मालिकेसाठी भारताचा दौरा केला होता, तेव्हा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

आयपीएलनंतर भारतीय संघाला खेळायची आहे टी२० मालिका
सध्या भारतात सुरू असलेल्या आयपीएलच्या १५व्या हंगामानंतर भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ सामन्यांची टी२० मालिका खेळायची आहे. ही मालिका भारतातच होणार असून ९ जून ते १९ जूनदरम्यान टी२० सामने खेळवले जातील. त्यानंतर भारतीय संघ २ सामन्यांच्या टी२० मालिकेसाठी आयर्लंडचा दौरा करेल. टी२० मालिकांनंतर भारतीय संघाला सरळ कसोटी मालिका खेळायची आहे. इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ २०२१ चा उर्वरित पाचव कसोटी सामना खेळेल, जो कोरोनामुळे स्थगित करण्यात आला होता.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

हे काय? पोलार्डने लाईव्ह सामन्यात पंचांना मारला बॉल आणि लागला हसू, कर्णधार रोहितनेही दिली साथ

केकेआरचा कर्णधार आणि कोचमध्ये नाही सर्वकाही अलबेल, माजी क्रिकेटरच्या प्रतिक्रियेने खळबळ

मुंबई इंडियन्सच्या पराभवाचे खलनायक ठरले ‘हे’ ३ क्रिकेटर्स, रोहितच्या भरवशाच्या खेळाडूचाही समावेश

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---