Thursday, March 23, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अहमदाबाद कसोटीचा पहिला दिवस पाहुण्यांच्या नावे! ख्वाजाच्या शतकाने ऑस्ट्रेलिया 4 बाद 255

March 9, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy:Twitter/ICC

Photo Courtesy:Twitter/ICC


भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथ्या आणि निर्णायक कसोटी सामन्याला गुरुवारपासून ( 9 मार्च) सुरुवात झाली. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी वर्चस्व गाजवले. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा याचे नाबाद शतक पहिल्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले.

An unbeaten 85-run stand between Khawaja and Green has put Australia in control.#WTC23 | #INDvAUS | 📝 https://t.co/VJoLfVSeIF pic.twitter.com/9Xu5aPnDLZ

— ICC (@ICC) March 9, 2023

 

दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी हजेरी लावलेल्या या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी हेड व ख्वाजा यांनी शानदार 61 धावांची सलामी दिली. मार्नस लॅब्युशेन केवळ 2 धावा करू शकला. त्यानंतर ख्वाजा व‌‌ कर्णधार स्मिथ ही जोडी जमली. त्यांनी दुसऱ्या सत्रात भारतीय संघाला एकही यश मिळू दिले नाही. त्यांनी 79 धावांची भागीदारी केली. दुसऱ्या सत्रानंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 2 बाद 149 अशी होती. मात्र, अखेरच्या सत्रात त जडेजाने पहिल्यांदा स्मिथ याला बाद करण्यात यश मिळवले. त्याने 38 धावा केल्या. पीटर हॅंड्सकॉम्ब केवळ 17 धावा करू शकला.

यानंतर मात्र ख्वाजाने कॅमेरून ग्रीनसह ऑस्ट्रेलियाचा डाव पुढे नेला. ग्रीनने भारतीय गोलंदाजांवर आक्रमण केले. दोघांनी पहिल्या दिवसाखेर भारताला यश मिळू दिले नाही. ख्वाजाने आपला संयम राखत दिवसातील अखेरच्या षटकात आपले 14 वे शतक पूर्ण केले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने 4 बाद 255 धावा केल्या. ख्वाजा 104 तर ग्रीन 49 धावांवर नाबाद आहे. भारतीय संघासाठी मोहम्मद शमी यांनी दोन तर अश्विन व जडेजा यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला. दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघाला लवकर बाद करण्याचे आव्हान भारतीय गोलंदाजांसमोर असेल.

(Australia Dominant Ahmedabad Test Day 1 Usman Khwaja Hits Unbeatan Century)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कर्णधार म्हणून स्मिथ जेव्हाजेव्हा भारतात आला तेव्हा नडलाय, पाहा ही जबरदस्त आकडेवारी
‘टीम इंडियाला भासतेय पंतची उणीव’, केएस भरतच्या गचाळ क्षेत्ररक्षणामुळे नेटकऱ्यांना आठवला रिषभ, Video


Next Post
Ravindra-Jadeja-And-Steve-Smith

स्मिथविरुद्ध जगातल्या कुठल्याच गोलंदाजाला न जमलेली 'अशी' कामगिरी, जडेजाने दाखवली करून; एकदा वाचाच

Photo Courtesy:Twitter/ICC

ख्वाजाने संपवला 13 वर्षांचा वनवास! भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत ठोकले यादगार शतक

Steve Smith

स्टीव्ह 'फेल' स्मिथ! चांगल्या सुरवातीनंतरही संपूर्ण मालिकेत फ्लॉप ठरलाय ऑसी कर्णधार

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143