Monday, March 27, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दिल्ली कसोटी: पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया सर्वबाद 263, शमीचा बळींचा चौकार

February 17, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter/BCCI

Photo Courtesy: Twitter/BCCI


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला शुक्रवारी (17 फेब्रुवारी) दिल्ली येथे सुरुवात झाली. अरुण जेटली स्टेडियम येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या दिवशीच ऑस्ट्रेलियाचा डाव 263 धावांवर गुंडाळला. ऑस्ट्रेलियासाठी उस्मान ख्वाजा व पीटर हॅंड्सकॉम्ब यांनी अर्धशतके झळकावली. तर, भारतासाठी मोहम्मद शमी याने सर्वाधिक 4 बळी आपल्या नावे केले.

2ND Test. WICKET! 78.4: Matthew Kuhnemann 6(12) b Mohammad Shami, Australia 263 all out https://t.co/hQpFkyZGW8 #INDvAUS @mastercardindia

— BCCI (@BCCI) February 17, 2023

पहिल्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. डेव्हिड वॉर्नर व उस्मान ख्वाजा यांनी 50 धावांची भागीदारी केली.‌ त्यानंतर ख्वाजा व‌‌ लॅब्युशेन यांनी 41 धावांची भागीदारी केली. मात्र, रविचंद्रन अश्विन याने लॅब्युशेन व अनुभवी स्टीव्ह स्मिथ यांना केवळ तीन चेंडूंच्या अंतराने तंबूत पाठवत ऑस्ट्रेलियाची घसरगुंडी घडवून आणली. एका बाजूने इतर फलंदाज बाद होत असताना ख्वाजा याने अर्धशतक साजरे केले.

त्याने पीटर हॅंड्सकॉम्बसह पाचव्या गड्यासाठी 59 धावांची भागीदारी केली. तो शतकाकडे मार्गक्रमण करत असताना केएल राहुल याच्या अप्रतिम झेलाने तो 81 धावांवर बाद झाला. त्यानंतर हॅंड्सकॉम्ब व कर्णधार पॅट कमिन्स या 60 धावांची भागीदारी केली. मात्र, जडेजा याने सलग पणे कमीच व मर्फी यांना बाद करत ऑस्ट्रेलियाचा डाव संपवण्याच्या दिशेने प्रयत्न केला. अखेरीस मोहम्मद शमी याने अखेरचे दोन बळी मिळवत ऑस्ट्रेलियाचा डाव 263 वर संपुष्टात आणला. पीटर हॅंड्सकॉम्ब 72 धावांवर नाबाद राहिला. भारतासाठी शमीने सर्वाधिक चार बळी मिळवले. तर, अश्विन व जडेजा या फिरकीपटूंनी प्रत्येकी दोन बळी आपल्या नावे केले.

(Australia First Inning All Out On 263 Khawaja And Handscomb Fifty Shami Took Four In Delhi Test)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

पुजाराचा शंभराव्या कसोटीबद्दल गावसकरांकडून खास सन्मान, व्हिडिओत दिसला भारतीय क्रिकेटचा इतिहास
नाणेफेकीचा कौल जिंकत ऑस्ट्रेलिया करणार बॅटिंग, टीम इंडियात ‘या’ पठ्ठ्याचे पुनरागमन


Next Post
MS-Dhoni-and-Hardik-Pandya

BREAKING: 31 मार्चपासून उडणार आयपीएल 2023 चा धुरळा, सीएसके-गुजरातमध्ये रंगणार उद्घाटनाचा सामना

Photo Courtesy: Twitter/BCCI

दिल्ली कसोटी: पहिला दिवस टीम इंडियाचा नावे, ऑस्ट्रेलियाला गुंडाळल्यानंतर दिवसाअखेर भारत बिनबाद 21

Sunrisers-Hyderabad

हैदराबादला मिळाला कर्णधार? मयंक अन् भुवी नाही, तर अश्विनने 'या' खेळाडूचं घेतलं नाव

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143