---Advertisement---

IND vs AUS; “रोहितचा पुढचा पाय अडकला…” ऑस्ट्रेलिया दिग्गजाने रोहितच्या जखमेवर चोळले मीठ

On: शुक्रवार, डिसेंबर 6, 2024 7:28 PM
---Advertisement---

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील 5 सामन्यांच्या बाॅर्डर-गावसकर मालिकेतील (Border Gavaskar Trophy) दुसरा कसोटी सामना ॲडलेडच्या मैदानावर खेळला जात आहे. त्यातील पहिला दिवस संपला. या सामन्यात सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला भारतीय कर्णधार रोहित शर्माची (Rohit Sharma) बॅट चालली नाही. तो केवळ 3 धावा करून बाद झाला. दरम्यान आता ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज ॲडम गिलख्रिस्टने (Adam Gilchrist) रोहितच्या जखमेवर मीठ चोळले आहे.

ऑस्ट्रेलियाविरूद्ध ॲडलेड ओव्हल येथे सुरू असलेल्या गुलाबी चेंडू कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय कर्णधार रोहित शर्माचा (Rohit Sharma) पुढचा पाय अडकल्यामुळे तो स्कॉट बोलंडच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू बाद झाला, असे ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू ॲडम गिलख्रिस्टला वाटत आहे. दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडलेल्या जोश हेझलवूडच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये बोलंडचा समावेश केला. ज्याने रोहितला तंबूत पाठवले. 6 वर्षांनंतर, रोहित मधल्या फळीत फलंदाजी करत होता. कारण रोहित 2019 पासून भारतासाठी सलामी देत आहे.

समालोचन करताना ॲडम गिलख्रिस्ट (Adam Gilchrist) म्हणाला, “हेझलवूड हा ऑस्ट्रेलियाचा पर्थमध्ये सर्वोत्तम गोलंदाज होता, पण त्याच्या जागी बोलंडला येथे खेळवणे वाईट नाही. बोलंड उंच आहे, पण हेझलवूड असता तर बॉल स्टंपला लागला असता का, याचे आश्चर्य वाटते. बोलंडकडे चेंडू स्किड करण्याची क्षमता आहे. इथे (रोहितच्या विकेटवर) असेच घडले. रोहित शर्माचा पुढचा पाय अडकला आणि गुड नाईट झाली.”

महत्त्वाच्या बातम्या-

“या कारणामुळे कसोटीत तुझी सरासरी 50च्या खाली गेली”, संजय मांजरेकरांचा विराट कोहलीला सल्ला
आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारे टाॅप-5 खेळाडू
जय शाह यांना मोठा धक्का! या संघटनेचं अध्यक्षपद हातून गेलं

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---