ऍशेस 2023चा पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना सध्या केविंगटन ओव्हल स्टेडियमवर खेळला जात आहे. मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाने 1-2 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियन संघ 103.1 षटकात 295 धावा करून सर्वबाद झाला. पॅट कमिन्स याच्या नेतृत्वातील पाहुण्या संघाने या सामन्यात 12 धावांनी आघाडी घेतली आहे. स्टीव स्मिथ याने या सामन्यात 123 चेंडूत 71 धावांची सर्वोत्तम खेली या डावात ऑस्ट्रेलियासाठी केली.
तत्पूर्वी पहिल्या डावात इंग्लंड संघाने 54.4 षटकांमध्ये 283 धावा केल्या होत्या आणि संघ सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियान संघाचा पहिला डावा 295 धावांमध्ये गुंडाळला गेला. स्टीव स्मिथ नंतर उस्मान ख्वाजा याने ऑस्ट्रेलियासाठी सर्वोत्तम खेळी केली. सलामीवीर उस्मान ख्वाजाने 157 चेंडूत 47 धावा केल्या. पहिल्या दिवशी डेविड वॉर्नर याच्या रुपात ऑस्ट्रेलियाने पहिली विकेट गमावली होती. वॉर्नरने 52 चेंडूत 24 धावांची खेली केली. दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाला पहिला झटका बसला मार्नस लॅबुशेन याच्या रुपात पसला. लॅबुशेनने 82 चेंडूत अवघ्या 9 धावा करून विकेट गमावली.
ऑस्ट्रेलियान संघाचा कर्णधार पॅट कमिन्स आणि टॉड मर्फी यांनी डावाच्या शेवटच्या षटकांमध्ये महत्वपूर्ण खेळी केली. कमिन्सने 86 चेंडूत 36 धावा केल्या, तर टॉड मर्फीने 39 चेंडूत 34 धावा केल्या. पहिल्या डावात इंग्लंडसाटी ख्रिस वोक्स याने 23 षटकात 61 धावांमध्ये सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. स्टुअर्ट ब्रॉड, मार्क वुड आणि जो रुट यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. दिग्गज जेम्स अँडरसन या डावातही जास्त काही कामगिरी करू शकला नाही. अँडरसनने या डावात एक विकेट घेतली. (Australia have managed to take a 12-run lead after the commencement of second innings.)
महत्वाच्या बातम्या –
हरमनप्रीत प्रकरण हाताबाहेर गेलंय! बीसीसीआय सचिवांकडून मिळाली महत्वाची माहिती
WIvsIND । फलंदाजाची गरज पूर्ण करण्यास संघ व्यवस्थापन असमर्थ! सूर्यावर का आली सॅमसनीच जर्सी घालण्याची वेळ?