रविवार (दि. 08 ऑक्टोबर) हा दिवस 140 कोटी भारतीय आणि जगभरातील क्रिकेटप्रेमींसाठी खूपच महत्त्वाचा आहे. कारण, या दिवशी भारतीय संघ वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील आपल्या अभियानाला सुरुवात करत आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ विश्वचषकाच्या पाचव्या सामन्यात आमने-सामने आहेत. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. या सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होत आहे. अशात या सामन्यापूर्वी वाजता नाणेफेक झाली, जी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने जिंकली. तसेच, फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात दोन्ही संघ एकमेकांना पराभूत करत स्पर्धेची सुरुवात विजयाने करण्याचा प्रयत्न करतील.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यात ट्रेविस हेड नाहीये. तसेच, सीन ऍबॉट आणि जोश इंग्लिश हेदेखील या सामन्याला मुकणार आहेत. दुसरीकडे, रोहित शर्मा (Rohit Sharma) याने सांगितले की, शुबमन गिल हा फिट झाला नाहीये. त्यामुळे या सामन्यात खेळणार नाहीये. त्याच्या जागी ईशान किशन (Ishan Kishan) सलामीला फलंदाजीला उतरेल.
🚨 Toss Update 🚨
Australia win the toss and elect to bat.
Follow the Match ▶️ https://t.co/ToKaGif9ri#CWC23 | #INDvAUS | #MeninBlue pic.twitter.com/3BxcFfqWnX
— BCCI (@BCCI) October 8, 2023
आमने-सामने आकडेवारी
भारत आणि ऑस्ट्रेलिया (India And Australia) संघात विश्वचषकातील आपला पहिला सामना खेळणार आहेत. मात्र, यापूर्वी त्यांच्यात विश्वचषकात झालेल्या सामन्यांची आकडेवारी पाहिली, तर दोन्ही संघ आतापर्यंत 12 वेळा एकमेकांशी भिडले आहेत. यादरम्यान ऑस्ट्रेलियाने दमदार कामगिरी करत 8 वेळा विजय मिळवला आहे, तर भारताला फक्त 4 सामन्यात विजय मिळवता आला आहे.
याव्यतिरिक्त संघातील एकूण आमने-सामने आकडेवारी पाहायची झाली, तर उभय संघ तब्बल 149 वनडे सामन्यांमध्ये आमने-सामने आले आहेत. यातील 56 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे, तर ऑस्ट्रेलियाने 83 सामन्यात यश मिळवले आहे. तसेच, 10 सामने अनिर्णित राहिले.
दुसरीकडे, भारतीय संघाने मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 70 वनडे सामने खेळले आहेत. यातील 32 सामन्यात भारत विजयी, तर 33 सामन्यात पराभूत झाला आहे. उभय संघातील 5 सामन्यांचा कोणताही निकाल लागला नाहीये.
विश्वचषकातील पाचव्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
ऑस्ट्रेलिया
डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅब्युशेन, ग्लेन मॅक्सवेल, ऍलेक्स कॅरे (यष्टीरक्षक), कॅमरून ग्रीन, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, ऍडम झम्पा, जोश हेझलवूड (Australia have won the toss and have opted to bat Against India World Cup 2023)
हेही वाचा-
क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी BCCIने उचललं मोठं पाऊल, घेतला ‘हा’ निर्णय
Asian Gamesमध्ये Gold जिंकताच भारतीय खेळाडूंनी गायलं ‘लहरा दो’ गाणं, ठुमके लावत हटके सेलिब्रेशन- Video