---Advertisement---

ऑस्ट्रेलियाची प्रतिष्ठा पणाला! पाचव्या सामन्यात टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय, भारतीय संघात एक मोठा बदल

On: रविवार, डिसेंबर 3, 2023 6:37 PM
Suryakumar-Yadav
---Advertisement---

बंगळुरूचं एम चिन्नास्वामी स्टेडिअम रविवारी (दि. 3 डिसेंबर) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील अखेरच्या सामन्याचे आयोजन करण्यासाठी सज्ज झाले आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार, सायंकाळी 7 वाजता खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी उभय संघात 6.30 वाजता नाणेफेक झाली. ही नाणेफेक ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार मॅथ्यू हेड याने जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. अशात या सामन्यात हेडची सेना विजय मिळवून मालिका 2-3ने संपवण्याचा प्रयत्न करेल.

या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने एक बदल केला आहे. अखेरच्या सामन्यात नेथन एलिसची संघात एन्ट्री झाली आहे. तसेच, क्रिस ग्रीन संघातून बाहेर पडला आहे. तसेच, भारतीय संघातही एक बदल आहे. दीपक चाहर संघातून बाहेर पडला असून त्याच्या जागी अर्शदीप सिंग याची एन्ट्री झाली आहे.

मालिकेतील कामगिरी
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात खेळल्या गेलेल्या या मालिकेतील पहिल्या 4 सामन्यांचा निकाल भारताच्या बाजूने लागला आहे. भारताने मालिकेतील पहिले दोन सामने अनुक्रमे 2 विकेट्स आणि 44 धावांनी जिंकले होते. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दमदार पुनरागमन करत सामना 5 विकेट्सने जिंकला. मात्र, रायपूरच्या चौथ्या सामन्यात भारताने पुनरागमन करत 20 धावांनी सामना खिशात घातला. अशाप्रकारे भारताने चौथ्या सामन्यानंतर मालिका 3-1ने नावावर केली. अशात पाचव्या सामन्याचा निकाल काय लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Australia have won the toss and have opted to field against india 5th t20i)

पाचव्या टी20 सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत
यशस्वी जयसवाल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार, अर्शदीप सिंग

ऑस्ट्रेलिया
ट्रेविस हेड, जोश फिलिप, बेन मॅकडर्मॉट, ऍरॉन हार्डी, टीम डेविड, मॅथ्यू शॉर्ट, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक/कर्णधार), बेन ड्वार्शुइस, नेथन एलिस, जेसन बेहरेन्डॉर्फ, तन्वीर संघा

हेही वाचा-
‘त्याला T20 World Cupमध्ये…’, पाचव्या टी20पूर्वी युवा खेळाडूविषयी दिग्गजाचे मोठे विधान
‘तो त्या लायकीचाच नाही…’, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचा वॉर्नरवर हल्लाबोल, वाचा का साधला निशाणा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---