गुरुवारी (दि. 12 ऑक्टोबर) वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 10व्या सामन्यात बलाढ्य संघ आमने-सामने असणार आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात लखनऊच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. यापूर्वी उभय संघात नाणेफेक झाली. ही नाणेफेक ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार पॅट कमिन्स याने गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघात दोन बदल झाले आहेत. कॅमरून ग्रीन याच्या जागी मार्कस स्टॉयनिस संघात परतला आहे. तसेच, ऍलेक्स कॅरे याची जागा जोश इंग्लिशने घेतली आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिका संघातही मोठा बदल झाला आहे. जेराल्ड कोएट्जी याच्या जागी तबरेझ शम्सी याची संघात एन्ट्री झाली आहे.
Australia have won the toss and they've decided to bowl first.
Stoinis and Inglis have replaced Green and Carey. pic.twitter.com/mwLTrkuvaN
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 12, 2023
स्पर्धेतील कामगिरी
विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत ऑस्ट्रेलिया (Australia) संघ आतापर्यंत एकच सामना खेळला आहे. त्यातही त्यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 6 विकेट्सने पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे त्यांच्यावर या सामन्यात दबाव असणार आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिका (South Africa) संघ स्पर्धेतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध 102 धावांनी जिंकला होता. अशात त्यांचा आत्मविश्वास य सामन्यात वाढलेला असेल.
विश्वचषकात आमने-सामने कामगिरी
उभय संघ आतापर्यंत विश्वचषकात 6 वेळा आमने-सामने आले आहेत. यात ऑस्ट्रेलियाचं पारडं जड असल्याचं दिसतं. कारण, ऑस्ट्रेलियाने यापैकी 3 सामने जिंकले आहेत. तसेच, दक्षिण आफ्रिका संघाला 2 सामने जिंकण्यात यश आले आहे, तर एक सामना बरोबरीत सुटला होता. (Australia have won the toss and have opted to field against south Africa)
विश्वचषकातील दहाव्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
ऑस्ट्रेलिया
डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅब्युशेन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, ऍडम झाम्पा, जोश हेझलवूड
दक्षिण आफ्रिका
क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), रासी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्करम, हेन्रीच क्लासेन, डेविड मिलर, मार्को यान्सेन, केशव महाराज, लुंगी एन्गिडी, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी
हेही वाचा-
‘इतक्या वर्षांमध्ये…’, सर्वाधिक षटकारांचा विक्रम मोडल्यानंतर ख्रिस गेलसाठी काय बोलला रोहित?, वाचाच
नवीनला चिडवणाऱ्या प्रेक्षकांना विराटने केले शांत, दोघांमध्ये झाली मैत्री; गंभीर म्हणाला, ‘कोहलीने…’