भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) स्पर्धा खेळली जात आहे. त्यातील पहिला सामना पर्थच्या मैदानावर रंगला आहे. दरम्यान दोन्ही संघात अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. भारत-ऑस्ट्रेलिया पहिल्या सामन्यातील दुसऱ्या दिवशी भारतीय सलामीवीर यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि केएल राहुल (KL Rahul) दोघांनी नाबाद खेळी केली आहे. दरम्यान आता ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी खेळपट्टीबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
पहिल्या सत्रात भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 104 धावांवर रोखला. यानंतर, दोन सत्रांमध्ये यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी स्वत: ला सिद्ध केले आणि सर्व मैदानावर फटके खेळत धावा केल्या. पहिल्या दिवशी भारताला 150 धावात गुंडाळणाऱ्या कांगारू गोलंदाजांनी दुसऱ्या दिवशी भारताची 1 विकेट घेण्याची तळमळ केली, मात्र त्यांना यश मिळाले नाही. ऑस्ट्रेलियाने 7 गोलंदाज वापरले, पण सलामीची भागीदारी तोडण्यात कोणालाही यश आले नाही.
सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड म्हणाले, “आज खेळपट्टी खूप कोरडी दिसत होती. ते खूप लवकर सुकले. आम्हाला वाटले की कदाचित चेंडू आणखी थोडा ‘स्विंग’ होईल. त्यामुळे मला वाटते की जर तुम्हाला असे म्हणायचे असेल की आम्ही थोडे आश्चर्यचकित झालो तर होय आम्ही होतो, कारण तितकी ‘सीम मूव्हमेंट’ किंवा ‘स्विंग’ नव्हती.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “गोलंदाज कालप्रमाणे सीम गोलंदाजी करत होते. त्यामुळे परिस्थितीने यात काही भूमिका बजावली असावी असे मला वाटते. तुम्ही स्विंग बघितले तर ते कालच्या तुलनेत कमी होते. कालचा दिवस कठीण होता. मात्र, मला वाटते केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल चांगले खेळले.”
भारतीय संघ पहिल्या डावात अवघ्या 150 धावांत आटोपला. पहिल्या डावात नितीश कुमार रेड्डीने (Nitish Kumar Reddy) सर्वाधिक 41 धावा केल्या होत्या. भारताने ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या 104 धावात आटोपला. भारताने दुसऱ्या डावात फलंदाजीत ताकद दाखवली आणि दुसऱ्या दिवशी यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांच्यात पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी झाली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर आता भारतीय संघ 218 धावांनी आघाडीवर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
तिलक वर्माने झंझावाती शतक झळकावून रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू!
IND vs AUS; “चेंडू खूप हळू येतोय” जयस्वालने केली स्टार्कची बोलती बंद!
टी20 क्रिकेटमध्ये भुवीचा जलवा! बुमराहला टाकलं मागे; अशी कामगिरी करणारा पहिलाच वेगवान गोलंदाज