क्रिकेट जगतातील सर्वात चर्चित सामना म्हणून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचे नाव घेतले जाते. शेजारी राष्ट्रे असलेल्या या दोन देशातील क्रिकेट सामना जगातील कोणत्याही कोपऱ्यात असला तरी, मैदाने तसेच टीव्हीसमोरील चाहत्यांचा उत्साह शिखरावर असतो. मात्र, राजकीय परिस्थितीमुळे या दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय मालिका खेळल्या जात नाहीत. मात्र, आता या दोन्ही कट्टर प्रतिस्पर्ध्यातील सामने पाहण्याची संधी चाहत्यांना मिळू शकते.
भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान नुकताच टी20 विश्वचषकातील सामना खेळला गेला. मेलबर्न येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला. या सामन्याला चाहत्यांची मोठी पसंती लाभली. करोडोंच्या संख्येत लोकांनी हा सामना ऑनलाईन स्ट्रिमींग व टीव्हीवर पाहिला. इतर देशातील अनेक आजी माजी क्रिकेटपटूंनी देखील हा सामना पाहणे म्हणजे एक पर्वणी असल्याचे म्हटले होते.
भारत-पाकिस्तानच्या याच महत्त्वाच्या स्पर्धेचा फायदा घेण्याचा प्रयत्न क्रिकेट ऑस्ट्रेलिया करत आहे. एका वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, नजीकच्या काळात भारत पाकिस्तान व ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान तिरंगी मालिका आयोजित करण्याचा मनसुबा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दाखवला असून, त्याला बाबत चर्चाही सुरू झालीये. तसेच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटी सामना देखील आयोजित करण्याचा विचार सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानेही इंग्लंडमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मालिका आयोजित करण्याचा मनोदय बोलून दाखवला होता. मात्र, दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डाने याला नकार कळवलेला. भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यानच्या अनेक राजकीय प्रश्नांमुळे दोन्ही देश एकमेकांविरुद्ध द्विपक्षीय मालिका खेळत नाहीत. 2013 मध्ये या दोन्ही देशांनी अखेरच्या वेळी एकमेकांविरुद्ध मालिका खेळलेली. त्यानंतर हे दोन्ही देश केवळ आयसीसी स्पर्धांमध्ये खेळताना दिसून येतात.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
काय सांगता! टी20 विश्वचषकातील सर्व चॅम्पियन संघ हरले, यंदा मिळणार नवा विजेता?
त्याला संघात घेण्यासाठी प्रशिक्षकाने भांडून बोर्डाला नियम बदलायला लावले होते…