शनिवारी (6 जानेवारी) ऑस्ट्रेलियन संघाने 8 विकेट्स राखून सिडनी कसोटीत पकिस्तानचा पराभव केला. कसोटी मालिकेतील हा तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना होता. उभय संघांतील या कसोटी मालिकेचा प्रभाव आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत पडला आहे. ऑस्ट्रेलियाच्या अप्रतिम प्रदर्शानामुळे भारताला नुकसान सोसावे लागले.
ऑस्ट्र्लियाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जिंकली. 2021-23 हंगामाच्या अंजिक्यपद स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यात होते. भारताला मात देत ऑस्ट्रेलियाने आपले पहिले कसोटी अजिंक्यपद पटकावले. आता आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या चालू हंगामातही भारतीय संघावर ऑस्ट्रेलिया भारी पडत आहे. शनिवारी (6 जानेवारी) कसोटी मालिकेत पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाकडून व्हाईट वॉश मिळाला. या विजयासोबत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया संघ पहिल्या क्रमांकावर पोहोचला. ही मजल मारत असताना ऑस्ट्रेलियाने भारताला दुसऱ्या क्रमांकावर ढकलले.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील केपटाऊन कसोटी सामना अवघ्या दीड दिवसात निकाली निघाला. मगंळवारी (3 जानेवारी) सुरू झालेला हा सामना बुधवारी (4 जानेवारी) दुसऱ्या सत्रात भारताने जिंकला. 7 विकेट्स राखून भारताने हा विजय मिळवला आणि कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. या विजयासोबतच दक्षिण आफ्रिकेला मागे टाकत भारतीय संघ अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर पोहोचला. अवघे दोनच दिवस संघाला हा आनंद मिळाला. कारण शनिवारी ऑस्ट्रेलियाने भारताला मागे टाकत गुणतालिकेतील पहिले स्थान मिळवले.
ऑस्ट्रेलियन संघ सध्या 56.25 गुणांसह गुणलातिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. तर दूसऱ्या क्रमांकावरील भारताकडे 54.16 गुण आहेत. तिसऱ्या स्थानी दक्षिण अफ्रिका असून, न्यूझीलंड चौथ्या, बांगलादेश पाचव्या, तर सहाव्या स्थानी पाकिस्तान आहे. वेस्ट इंडिज, इंग्लंड, श्रीलंका हे अनुक्रमे सातव्या, आठव्या आणि नवव्या स्थानावर आहेत. भारताला चालू महिन्यात इंग्लंडविरूद्धची कसोटी मालिका सुरू करायची आहे. पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेत भारताचे प्रदर्शन चांगले राहिले, तर संघ पुन्हा गिणतालिकेतील पहिला क्रमांक गाठू शकतो.
महत्वाच्या बातम्या –
मागच्या वर्षाप्रमाणे 2024 ची सुरुवात कमिन्ससाठी ठरली खास, पाकिस्तानला ‘व्हाईट वॉश’
AUS vs PAK । पाकिस्तान संघाचे विराटच्या पावलावर पाऊल! शेवटच्या कसोटीत वॉर्नरला खास भेट