---Advertisement---

“अरे अजिंक्य दादा, शुबमनला ३० धावा करू द्यायच्या ना, म्हणजे…” ऑस्ट्रेलियन अँकरची रहाणेकडे खास मागणी

On: मंगळवार, डिसेंबर 29, 2020 1:03 PM
---Advertisement---

नुकत्याच मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पार पडलेल्या ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्यात भारताने ८ विकेट्सने ऑस्ट्रेलियावर मात केली आहे. या दणदणीत विजयासह भारताने मालिकेत १-१ ने बरोबरी साधली. भारताचा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेने या पूर्ण सामन्यात दमदार प्रदर्शन केले. तर युवा पदार्पणवीर शुबमन गिलनेही संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिडा निवेदिका क्लॉय अमांडा बेली हिने ट्विट करत गिलसाठी रहाणेकडे खास मागणी केली.

ऑस्ट्रेलियन निवेदिकेने रहाणेला म्हटले ‘दादा’

भारतीय संघाच्या या दणदणीत विजयानंतर ऑस्ट्रेलियन निवेदिका अमांडा बेली हिने तिच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक ट्विट केले. तिने लिहिले की, “जिंक्स (अजिंक्य) दादा. तू शुबमनला उरलेल्या ३७ धावांमधील ३० धावा करू द्यायच्या ना. म्हणजे त्याचे कसोटी पदार्पणातील अर्धशतक पूर्ण झाले असते.” या ट्विटसह तिने हसतानाचे इमोजीही टाकले आहेत.

तिच्या या ट्विटवर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने तर, ‘रहाणेला जिंक्स म्हटलेले आवडत नाही’, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तिच्या या ट्विटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

यापुर्वी आली होती चर्चेत

काही दिवसांपुर्वी भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीविषयी केलेल्या एका पोस्टमुळे अमांडा बेली चर्चेत आली होती. तिने विराटची पत्नी अनुष्का शर्माने त्यांच्या होणार्‍या बाळाला ऑस्ट्रेलियात जन्म द्यावा, अशी इच्छा व्यक्त केली होती. जेणेकरून ते बाळ भविष्यात ऑस्ट्रेलियन क्रिकेटर व्हावे. विराटची मोठी चाहती म्हणूनही अमांडा बेली प्रसिद्ध आहे.

रहाणे-गिलची बॉक्सिंग डे कसोटीतील कामगिरी

‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात अनुभवी फलंदाज रहाणेने भारताकडून सर्वाधिक केल्या होत्या. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत २३३ चेंडूत १२ चौकारांच्या मदतीने त्याने १२२ धावांची अफलातून खेळी केली होती. रहाणेव्यतिरिक्त गिलनेही सलामीला फलंदाजी करताना प्रभावी खेळी केली होती. त्याने अवघ्या ६५ चेंडूंचा सामना करत ८ चौकारांच्या मदतीने ४५ धावा केल्या होत्या.

एवढेच नव्हे तर, ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावातील ७० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गिल-रहाणेने ६१ धावांची भागिदारी साकारली. यामुळे अवघ्या १५.५ षटकात २ विकेट्सच्या नुकसानावर भारताने ऑस्ट्रेलियाचे आव्हान पूर्ण केले.

फलंदाजीबरोबर क्षेत्ररक्षणातही रहाणे आणि गिलने महत्त्वपूर्ण कामगिरी केली. रहाणेने सामन्यादरम्यान पहिल्या डावात ट्रॅविस हेड आणि दुसऱ्या डावात मार्नस लॅब्यूशानेचा झेल पकडला. तर गिलनेही पहिल्या डावात लॅब्यूशानेचा झेल पकडत मोहम्मद सिराजला त्याची पहिली कसोटी विकेट मिळवून दिली.

महत्त्वाच्या बातम्या-

कॅप्टनकूल नंतर फक्त रहाणे..! बॉक्सिंग डे कसोटी जिंकत अजिंक्यची धोनीच्या मोठ्या विक्रमाशी बरोबरी

व्वा रे सिराज! भारताच्या कसोटी क्रिकेट इतिहासात ‘असा’ पराक्रम करणारा दुसराच

शानदार शुभमन! आशिया बाहेर पदार्पण करताना ‘अशी’ कामगिरी करणारा केवळ चौथाच भारतीय सलामीवीर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---