भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI) सप्टेंबर-डिसेंबर 2025 मध्ये ऑस्ट्रेलिया महिला संघ ,ऑस्ट्रेलिया पुरुष अ संघ आणि दक्षिण आफ्रिका पुरुष अ संघ यांच्या भारत दौऱ्यावरील स्पर्धेची घोषणा केली आहे. ज्यामध्ये वेगवेगळ्या फॉरमॅटमधील एकूण 13 सामने खेळले जाणार आहेत. त्यामध्ये सर्वात आधी भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ (indian women’s cricket team Vs Austrelia women’s cricket team) यांच्यामध्ये 3 सामन्यांची वनडे मालिका (ODI series) खेळली जाणार आहे. याची सुरुवात 14 सप्टेंबर पासून होईल.
ऑस्ट्रेलिया महिला संघ तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारताचा दौरा करणार आहेत. जे की आयसीसी महिला क्रिकेट विश्व कप 2025 आधी महत्त्वपूर्ण तयारीच्या स्वरूपात असेल. ही मालिका चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळली जाणार आहे.
ऑस्ट्रेलिया महिला संघ विरुद्ध भारतीय महिला संघ एक दिवसीय मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक
पहिला एकदिवसीय सामना
रविवार, 14 सप्टेंबर 2025 (दुपारी 1:30 वाजता)
2 रा एकदिवसीय सामना
बुधवार, 17 सप्टेंबर 2025 (दुपारी 1:30 वाजता)
3 रा एकदिवसीय सामना
शनिवार, 20 सप्टेंबर 2025 (दुपारी 1:30 वाजता)






