---Advertisement---

ऑस्ट्रेलियाच्या विजयाने वाढल्या टीम इंडियाच्या अडचणी; WTC अंतिम फेरीसाठी करावा लागणार संघर्ष

On: रविवार, डिसेंबर 11, 2022 10:18 PM
Cricket-Australia
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्या दरम्यानच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने आपल्या नावे केला. ऑस्ट्रेलियाने ऍडलेड येथे झालेल्या या सामन्यात तब्बल 419 धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत जाण्यापासून ऑस्ट्रेलिया संघ अवघे काही पावले दूर आहे. ऑस्ट्रेलिया संघाला या गुणतालिकेत फायदा झाला असला तरी, भारतीय संघापुढील अडचणी वाढल्या आहेत.

ऑस्ट्रेलिया संघाने चौथ्या दिवशीच वेस्ट इंडिजला पराभूत करत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुंतलिकेतील आपले अव्वल स्थान भक्कम केले. या विजयानंतर ऑस्ट्रेलिया 75 टक्के विजय गुणांसह पहिल्या स्थानी आहे. तर, 60 टक्के विजय गुणांसह दक्षिण आफ्रिकेने दुसरा क्रमांक कायम ठेवला आहे.‌ श्रीलंकेचा संघ 53.33 टक्के विजय गुण मिळवून तिसऱ्या, तर भारतीय संघ 52.08 गुणांसह चौथ्या स्थानी आहे. पाकिस्तानचा संघ सध्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे. त्यांचे 46.67 टक्के गुण आहेत.

 

एकंदर परिस्थितीचा विचार केल्यास ऑस्ट्रेलिया संघ अंतिम फेरीत जागा बनवू शकतो. दुसऱ्या स्थानासाठी मात्र जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. भारतीय संघाला बांगलादेश विरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेत निर्भळ यश मिळवावे लागेल. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतील पहिली कसोटी गमावल्याने पाकिस्तान संघ अडचणीत आहे. तर भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत एकापेक्षा जास्त पराभव पत्करून चालणार नाही.

भारतीय संघाचे या मालिकेत दोन पराभव झाल्यास, ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका या मालिकेवरही भारताचे भवितव्य अवलंबून असणार आहे. कारण, दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवल्यास ते अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकतात.

(Australia Top WTC 2021-2023 Cycle Points Table)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ईशानच्या द्विशतकानंतर संपणार ‘या’ खेळाडूची कारकीर्द? दिनेश कार्तिकचे मोठे वक्तव्य
ज्याच्या विक्रमाची केली बरोबरी, त्याच्याकडूनच मिळाली दाद; मॅक्युलमसमोर स्टोक्सचा नाद खुळा पराक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---