पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड संघात 9 डिसेंबरपासून दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यातील दुसऱ्या डावात इंग्लंडचा संघ 275 धावांवर सर्वबाद झाला. इंग्लंडने पाकिस्तानला आता विजयासाठी 355 धावांचे आव्हान दिले आहे. खरं तर, इंग्लंडच्या दुसऱ्या डावादरम्यान बेन स्टोक्स याने शानदार कामगिरी केली. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत न्यूझीलंड संघाचा माजी क्रिकेटपटू ब्रेंडन मॅक्युलम याची बरोबरी केली आहे.
बेन स्टोक्सचा विक्रम
बेन स्टोक्स (Ben Stokes) याने इंग्लंडच्या दुसऱ्या डावादरम्यान 51 चेंडूत 41 धावांची खेळी केली. यावेळी त्याने 1 चौकार आणि 1 षटकारही खेचला. या षटकारामुळे त्याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 107 षटकार ठोकण्याचा कारनामा केला. याबाबतीत त्याने ब्रेंडन मॅक्युलम (Brendon McCullum) याच्या विक्रमाची बरोबरी केली. मॅक्युलमनेही त्याच्या कसोटी कारकीर्दीत एकूण 107 षटकार मारले होते. आता स्टोक्स आपल्याच प्रशिक्षक आणि न्यूझीलंडचा माजी खेळाडू मॅक्युलमचा हा विक्रम मोडण्यापासून फक्त एक षटकार दूर आहे.
Ben Stokes equals Brendon McCullum's record of most Sixes in Test Cricket history – Both have 107 SIXES. pic.twitter.com/M9uzhXxsjX
— Tanuj Singh (@ImTanujSingh) December 11, 2022
स्टोक्सने त्याच्या कसोटी कारकीर्दीत 160 डावांमध्ये 107 षटकार मारले आहेत, तर मॅक्युलमने 176 डावांमध्ये 107 षटकार मारले होते. याबाबतीत ऑस्ट्रेलियाचा ऍडम गिलख्रिस्ट दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने त्याच्या कसोटी कारकीर्दीत 137 डावांमध्ये एकूण 100 षटकार मारले आहेत. दुसरीकडे ख्रिस गेल याने कसोटीत 98 षटकार मारले आहेत. जॅक कॅलिसने 97 आणि वीरेंद्र सेहवाग याने 91 षटकार मारले आहेत.
ब्रेंडन मॅक्युलम यांनी वाजवल्या टाळ्या
खरं तर, बेन स्टोक्स याने जेव्हा मॅक्युलम यांच्या सर्वाधिक षटकार मारणाऱ्या विक्रमाची बरोबरी केली, तेव्हा प्रशिक्षक म्हणून मॅक्युलम यांनाही आनंद झाला. इतकेच नाही, तर स्टोक्सने जेव्हा त्यांच्या विक्रमाची बरोबरी केली, तेव्हा त्यांनी टाळ्यांचा कडकडाटही केला आणि स्टोक्सचे अभिनंदनही केले.
An applaud from Brendon McCullum as Ben Stokes equals his record for most Test sixes. pic.twitter.com/c1daHVILjt
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 11, 2022
मालिकेबद्दल बोलायचं झालं, तर इंग्लंड संघ मालिकेत 1-0ने पुढे आहे. रावळपिंडी कसोटी सामना जिंकल्यानंतर इंग्लंड संघ मुलतान कसोटी जिंकत मालिका आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड संघातील ही कसोटी मालिका 3 सामन्यांची आहे. (most six in test cricket an applaud from brendon mccullum as ben stokes equals his record read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘आता 200 धावा केल्या आहेत…’, विश्वचषकातील निवडीच्या प्रश्नावर ईशानचे मोठे वक्तव्य
सलाम तुझ्या समर्पणाला! 3 दिवसांपूर्वी पडले होते 4 दात, आता पुनरागमन करत संघाला बनवले विजयी






