शुक्रवारी (दि. 14 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना पार पडला. कॅनबेरा स्टेडिअमवर पार पडलेला हा सामना अनिर्णित राहिला. मात्र, ही मालिका इंग्लंड क्रिकेट संघाने आपल्या खिशात घातली. टी20 विश्वचषकापूर्वी इंग्लंडने आपला दम दाखवला आहे. इंग्लंडने या मालिकेत ऑस्ट्रेलियाला 2-0ने पराभूत केले. शेवटच्या अनिर्णित राहिलेल्या सामन्यानंतर मालिकेतील सर्वोत्तम कामगिरीसाठी इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. मात्र, पावसामुळे हा सामना 12 षटकांचा ठेवण्यात आला. यावेळी फलंदाजीला आलेल्या इंग्लंड संघाने 12 षटकात 3 विकेट्स गमावत 112 धावा चोपल्या. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला ऑस्ट्रेलिया संघ 3 विकेट्स गमावत 30 धावसंख्येवर असतानाच पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला. त्यामुळे या सामन्याचा निकाल लागला नाही. अशाप्रकारे इंग्लंडने 2-0ने मालिका आपल्या नावावर केली.
The game has been called off in Canberra and England finish the series with a 2-0 win 🙌🏻
📝 Scorecard: https://t.co/HhDJboUF5D pic.twitter.com/5NCwqgRZEg
— ICC (@ICC) October 14, 2022
ऑस्ट्रेलिया संघाकडून फलंदाजीला उतरलेल्या मार्कस स्टॉयनिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी सर्वाधिक 8 धावांचे योगदान दिले. स्टॉयनिस यावेळी नाबाद राहिला. तसेच, स्टीव्ह स्मिथ यानेही नाबाद 7 धावांची खेळी केली. दुसरीकडे, कर्णधार ऍरॉन फिंच (Aaron Finch) हा शून्य धावेवर तंबूत परतला. त्याच्यानंतर मिशेल मार्श यालादेखील एकही धाव काढता आली नाही. तो शून्य धावेवर बाद झाला. यावेळी इंग्लंडकडून गोलंदाजी करताना एकट्या ख्रिस वोक्स याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने 2 षटके गोलंदाजी करताना 4 धावा देत 3 विकेट्स आपल्या नावावर केल्या. त्याने वरच्या फळीतील फिंच, मॅक्सवेल आणि मार्श यांना तंबूत धाडले.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडकडून कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून सर्वाधिक धावा करण्यात यशस्वी ठरला. त्याने 41 चेंडूत 65 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 1 षटकार आणि 7 चौकारांचाही पाऊस पाडला. तसेच, डेविड मलान (30) आणि बेन स्टोक्स (नाबाद 17) यांनीही योगदान दिले. यावेळी ऍलेक्स हेल्स शून्य धावेवर तंबूत परतला. यावेळी ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना जोश हेजलवूड आणि पॅट कमिन्स या दोघांनीही प्रत्येकी एक विकेट आपल्या नावावर केली.
Jos Buttler in the mood heading into the #T20WorldCup 💪
Australia have a task on their hand in the rain-truncated 12-over chase!
Watch #AUSvENG LIVE on https://t.co/CPDKNxoJ9v (in select regions) 📺 | 📝 Scorecard: https://t.co/HhDJboUF5D pic.twitter.com/beXMPbpW2N
— ICC (@ICC) October 14, 2022
हेही वाचा- ब्रेकिंग! टी20 विश्वचषकात बुमराहच्या जागी मोहम्मद शमीची वर्णी, बीसीसीआयने दिली माहिती
इंग्लंडचा मालिका विजय
ही द्विपक्षीय मालिका इंग्लंड संघाने आपल्या नावावर केली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड संघात झालेल्या या मालिकेतील पहिला टी20 सामना इंग्लंडने 8 धावांनी जिंकला होता. त्यानंतर खेळण्यात आलेल्या दुसऱ्या टी20 सामन्यातही इंग्लंड संघ 8 धावांनी विजयी झाला. अशाप्रकारे इंग्लंडने ही मालिका 2-0ने आपल्या नावावर केली. इंग्लंडकडून या मालिकेत कर्णधार जोस बटलर याने 3 सामन्यात फलंदाजी करताना 75च्या सरासरीने एकूण 150 धावा चोपल्या. यावेळी त्याची सर्वोत्तम धावसंख्या ही 68 इतकी होती. त्यामुळे त्याला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बाबो! भारत अन् पाकिस्ताननंतर आता ऑस्ट्रेलिया- न्यूझीलंड बनला चाहत्यांचा आवडता सामना, सर्व तिकिटांची विक्री
‘हुड्डा आ जाएगा मैं चला…’, हे काय बोलून गेला विराट? व्हिडिओ व्हायरल