Loading...

बुमराह एक, पराक्रम अनेक- भारताच्या या शिलेदाराचे भीमपराक्रम पहाच

मेलबर्न। भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात १३७ धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ८६ धावांत ९ विकेट्स घेत विजयात मोलाची भूमीका निभावली आहे. त्याला या सामन्याचा सामनावीर पुरस्कारही देण्यात आला आहे.

याबरोबरच त्याने या सामन्यात अनेक विक्रमही रचले आहेत. बुमराहने याच वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊनमध्ये कसोटी पदार्पण केले होते. पदार्पणाच्या वर्षीच त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.

जसप्रीत बुमराहने केले हे खास विक्रम –

१. कसोटी पदार्पणाच्या वर्षात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत जसप्रीत बुमराह तिसऱ्या क्रमांकावर. त्याने ९ कसोटी सामन्यातील १८ डावात ४८ विकेट्स घेतल्या आहेत.

या यादीत अव्वल क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचे टेरी अल्डरमन असून त्यांनी १९८१ मध्ये कसोटीत पदार्पण करताना ५४ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच दुसऱ्या क्रमांकावर विंडीजचे कर्टली अँब्रोस आहेत. त्यांनी १९८८ मध्ये कसोटी पदार्पण करत त्यावर्षी ४९ विकेट्स घेतल्या होत्या.

Loading...

२. कसोटीमध्ये परदेशात खेळताना भारताकडून एका वर्षात सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या यादीत बुमराह अव्वल क्रमांकावर.

एका वर्षात परदेशात सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज –

४८ विकेट्स – जसप्रीत बुमराह (२०१८)

४५ विकेट्स – मोहम्मद शमी (२०१८)

Loading...

४१ विकेट्स – अनिल कुंबळे (२००६)

३. एकाच वर्षात ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये कसोटीत एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा पहिला आशियाई गोलंदाज ठरला आहे.

४. बुमराहची ८३ धावांत ९ विकट्स ठरली भारतीय वेगवान गोलंदाजाने ऑस्ट्रेलियात केलेली सर्वोत्तम गोलंदाजीची आकडेवारी. याआधी हा विक्रम कपिल देव यांच्या नावावर होता. त्यांनी १९८५ मध्ये १०९ धावांत ८ विकेट्स घेतल्या होत्या.

५. बुमराह ठरला २०१८ या वर्षात आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज. त्याने या वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३० सामन्यात ३९ डावात ७८ विकेट्स घेतल्या आहेत.

६. एका वर्षात कसोटीमध्ये ४० विकेट्स घेण्याचा टप्पा पार करणारा बुमराह भारताचा ६ वा वेगवान गोलंदाज.

एका वर्षात कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय वेगवान गोलंदाज-

७५ विकेट्स – कपिल देव(१९८३)

७४ विकेट्स –  कपिल देव(१९७९)

५१ विकेट्स – झहिर खान (२००२)

Loading...

४८ विकेट्स – जसप्रीत बुमराह (२०१८)

४७ विकेट्स – झहिर खान (२०१०)

४७ विकेट्स –  मोहम्मद शमी (२०१८)

४४ विकेट्स – जवागल श्रीनाथ (१९९९)

४३ विकेट्स – इशांत शर्मा (२०११)

Loading...

४१ विकेट्स – झहिर खान (२००७)

४१ विकेट्स – इशांत शर्मा (२०१८)

महत्त्वाच्या बातम्या:

विकेट्स घेतल्या बुमरहाने, धावा केल्या पुजाराने, विक्रम झाला इशांतच्या नावावर

पंत फक्त बडबड करत नाही तर हा मोठा इतिहासही घडवतो

ही दोस्ती तुटायची नाय! शमी -बुमराहची कहानी, सगळ्यांमध्ये अनोखी

You might also like
Loading...