मेलबर्न येथे खेळल्या जात असलेल्या चौथ्या कसोटीचा तिसरा दिवस नितीश कुमार रेड्डीच्या नावावर राहिला. नितीशने आपल्या ऐतिहासिक शतकाने बॉक्सिंग डे कसोटीचे वळण बदलले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने 9 गडी गमावून 358 धावा केल्या आहेत. दिवसाखेर नितीश कुमार रेड्डी 105 आणि मोहम्मद सिराज 02 धावांवर नाबाद परतले. टीम इंडिया आता कांगारूंपेक्षा 116 धावांनी मागे आहे.
आज तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात रिषभ पंत 28 धावा करून तर रवींद्र जडेजा 17 धावा करून बाद झाला. तेव्हा भारताला फॉलोऑनचा धोका होता. भारताने 221 धावांत सात विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर सामना भारताच्या हातातून पूर्णपणे निसटल्यासारखे वाटले, पण खरी लढत अजून व्हायची होती. नितीशकुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी हार मानली नाही. या दोघांनीही आपल्या दमदार फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
नितीश आणि सुंदर यांनी आठव्या विकेटसाठी 127 धावांची भागीदारी केली. सुंदरने 162 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने 50 धावा केल्या. नितीशने जबरदस्त शतक झळकावले. रेड्डीने 171 चेंडूत 10 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. नितीश आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. त्याने संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. त्याच्या शतकी खेळीने टीम इंडियाला मजबूत स्थान मिळवून दिले.
दुसऱ्या दिवसापर्यंत भारतीय संघाने केवळ 164 धावांत पाच विकेट गमावल्या होत्या. इथून भारतीय संघ पहिल्या डावात मोठी धावसंख्या गाठू शकणार नाही असे वाटत होते. आज तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने 191 धावांच्या स्कोअरवर सहावा विकेट आणि 221 रन्सच्या स्कोअरवर सातवा विकेट गमावला. यानंतर संघाला मोठी भागीदारीची गरज होती, जे नितीश रेड्डी आणि सुंदर यांनी स्वीकारली आणि 8वी विकेट पडेपर्यंत संघाला 348 धावांपर्यंत नेले. तिसरा दिवस टीम इंडियाच्या नावावर होता असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.
हेही वाचा-
नितीश रेड्डीच्या शानदार शतकानंतर माजी दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया! म्हणाला, “त्याचे हे शतक भारतीय…”
IND vs AUS; सामना एक विक्रम अनेक, 21 वर्षीय नितीशकुमारने मेलबर्न गाजवले..!
IND vs AUS; रोहित शर्माबद्दल माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य! म्हणाला, “तो व्हीआयपी…”