भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान नुकत्याच पार पडलेल्या ब्रिस्बेन येथील कसोटी सामन्यात भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवत बॉर्डर-गावसकर मालिका 2-1 ने जिंकली आहे. भारताच्या या विजयाचा नायक ठरला तो यष्टिरक्षक रिषभ पंत. रिषभने सामन्याच्या पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या 328 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शानदार 89 धावांची आक्रमक खेळी केली. रिषभने देखील ही खेळी विशेष असल्याचे म्हंटले असून त्याने सर्व क्रिकेटप्रेमींचे आभार मानले आहे.
सामना संपल्यानंतर रिषभ म्हणाला, “हा माझ्या जीवनातील सर्वात मोठा क्षण आहे. मला आनंद होत आहे की जेव्हा मी खेळत नव्हतो तेव्हा देखील सर्व कोच व सर्व सहकाऱ्यांनी मला साथ दिली. ही एखाद्या स्वप्नासारखी मालिका ठरली आहे. टीम मॅनेजमेंटने नेहमीच मला साथ दिली. ते नेहमी म्हणायचे की तू मॅच विनर खेळाडू आहेस आणि संघासाठी सामना जिंकून देवू शकतोस. मी प्रत्येक दिवशी विचार करायचो की मला संघासाठी सामना जिंकायचा आहे. व मी आज त्यात यशस्वी ठरलो. ”
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिंसने देखील रिषभच्या खेळीचे कौतुक केले असून, त्याला उत्तम खेळाडू मानले आहे. कमिंस सोबतच ऑस्ट्रेलियन कोच जस्टीन लॅंगर यांनी देखील रिषभची वाहवा केली आहे. लॅंगरने रिषभच्या खेळीची तुलना बेन स्टोक्सने 2019 अॅशेस मालिकेत खेळलेल्या खेळीशी केली आहे.”
रिषभने सामन्याच्या पाचव्या दिवशी 138 चेंडूत 9 चौकार व 1 षटकारासह 89 धावांची आक्रमक खेळी केली. रिषभच्या या खेळीमुळेच भारतीय संघाला 328 धावांचे डोंगरा एवढे लक्ष पार करण्यात यश मिळाले. आपल्या आक्रमक खेळी साठी रिषभला सामनावीराचा पुरस्कार देखील घोषित करण्यात आला.
महत्वाच्या बातम्या:
म्हणून भारतीय संघाच्या विजयानंतर राहुल द्रविडची होतेय चर्चा
आयपीएल २०२१ : जाणून घ्या कोणत्या संघाने किती खेळाडूंना केले मुक्त आणि कोणत्या खेळाडूंना केले कायम
BAN vs WI : शाकिब अल हसनच्या दमदार पुनरागमनाच्या जोरावर बांग्लादेशचा विंडीजवर ६ गड्यांनी विजय