भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान चार कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 8 विकेटने पराभव केला आहे. सामन्यातील सुरुवातीचे दोन दिवस भारतीय संघ आघाडीवर होता, मात्र तिसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रातच भारताचा दुसरा डाव केवळ 36 धावांवर संपुष्टात आला. भारताच्या या पराभवानंतर संपूर्ण क्रिकेट वर्तुळाचे लक्ष दुसऱ्या कसोटी सामन्याकडे लागले असून, भारतीय संघ या सामन्यात कशाप्रकारे पुनरागमन करतो हे बघणे उत्सुकतेचे ठरेल.
पहिल्या कसोटी सामन्यानंतर भारताला दोन मोठे झटके बसले आहेत. नियमित कर्णधार विराट कोहली पालकत्व रजा घेऊन भारतात परतला असून, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या हाताला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो संपूर्ण मालिकेतून बाहेर झाला आहे. अशा परिस्थितीत हे बघणे उत्सुकतेचे ठरेल की कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानात कशाप्रकारे पुनरागमन करतो. आपण या लेखात बघणार आहोत दुसऱ्या कसोटी सामन्या बद्दल संपूर्ण माहिती.
१) केव्हा व कोठे असेल सामना –
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधील दुसरा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाणार आहे.
२) किती वाजता सुरु होणार सामना –
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघामधील कसोटी सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 5 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी पहाटे 4.30 वाजता नाणेफक होणार आहे.
३ ) येथे बघू शकतात पूर्ण सामना –
भारत आणि ऑस्ट्रेलियामधील दुसऱ्या कसोटी सामन्याचे प्रक्षेपण Sony Six, Sony Ten 1 आणि Sony Ten 3 या चॅनेलवर होणार आहे. Sony Liv या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर देखील तुम्ही सामना बघू शकतात.
यातून निवडले जातील 11 जणांचे संघ –
भारतीय संघ –
पृथ्वी शॉ, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (कर्णधार), हनुमा विहारी, वृध्दिमान साहा (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा, नवदीप सैनी, शुभमन गिल, केएल राहुल, रिषभ पंत(यष्टीरक्षक), मोहम्मद सिराज, कुलदीप यादव
ऑस्ट्रेलियन संघ –
मॅथ्यू वेड, जो बर्न्स, मार्नस लॅब्यूशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, टिम पेन (यष्टीरक्षक/कर्णधार), पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेजलवूड, मार्कस हॅरिस, मोझेस हेन्रिक्स, मायकेल नेसर, जेम्स पॅटिन्सन, मिशेल स्वीप्सन.
महत्त्वाच्या बातम्या –
व्हिडिओ : फलंदाज बाद नसूनही अंपायरने दिले आऊट; समालोचक वैतागून म्हणाला, “बस आता खूप झालं”
अजित आगरकर का नाही बनला टीम इंडियाचे निवडकर्ता? घ्या जाणून
…म्हणून ऍलिस्टर कूकला इशांत शर्माची विकेट घेतल्याचा पश्चाताप
ट्रेंडिंग लेख –
…आणि सचिनचा कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडण्याची संधी कूकने दवडली !!!
वाढदिवस विशेष: ऍलिस्टर कूकच्या नावावर आहेत हे खास ५ विक्रम
बॉक्सिंग डे कसोटी! पाहा काय आहे भारताचा आत्तापर्यंतचा इतिहास