शनिवारपासून (२६ डिसेंबरपासून) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात मेलबर्न येथे कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना बॉक्सिंग डे कसोटी सामना म्हणून चर्चेत आहे. बॉक्सिंग डे कसोटी म्हणजे २६ डिसेंबरला होणारा कसोटी सामना.
सन १९८० पासून नियमितपणे दरवर्षी २६ ते ३० डिसेंबरदरम्यान मेलबर्न येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाहुण्या संघात बॉक्सिंग डे कसोटी सामना खेळला जातो. याला अपवाद केवळ सन १९८९ चा राहिला आहे. त्यावर्षी २६ डिसेंबरला ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका संघात वनडे सामना झाला होता.
भारताचा बॉक्सिंग डे कसोटीचा इतिहास –
भारताने आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये मेलबर्न येथे १९८० नंतर ८ बॉक्सिंग डे कसोटी सामने खेळले आहेत. हे ८ सामने भारताने सन १९८५, १९९१, १९९९, २००३, २००७, २०११, २०१४ आणि २०१८ या ८ वर्षी खेळले आहेत.
यातील सन १९९१, १९९९, २००३, २००७ आणि २०११ या ५ वर्षी भारताला बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात पराभूत व्हावे लागले आहे. तर १९८५ आणि २०१४ ला भारतीय संघ बॉक्सिंग डे कसोटी सामना अनिर्णीत राखण्यात यशस्वी ठरला आहे. त्याचबरोबर भारताने २०१८ ला पहिल्यांदाच बॉक्सिंग डे कसोटी सामना जिंकण्यात यश मिळवले होते.
भारताचा बॉक्सिंग डे कसोटी सामन्याचा इतिहास पाहाता तो फारसा चांगला नाही. मात्र असे असले तरी मागील २ बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारताने पराभव स्विकारलेला नाही, ही भारतीय संघासाठी जमेची बाजू आहे. त्यातही २०१८ ला तर भारताने तब्बल १३७ धावांनी विजय मिळवलेला आहे.
बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दबदबा –
सन १९८० पासून मेलबर्नमध्ये आत्तापर्यंत ३९ बॉक्सिंग डे कसोटी सामने खेळले गेले आहेत. त्यातील २२ सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आहे. तर ८ सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभव स्विकारावा लागला आहे आणि ९ सामने अनिर्णीत राहिले आहेत.
ऑस्ट्रेलियाने मेलबर्न येथे शेवटचा बॉक्सिंग डे कसोटी सामना सन २०१९ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने २४७ धावांनी विजय मिळवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘तुम्ही अलिकडे जरा विचित्र वक्तव्य करताय’ स्मिथचे ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूला जोरदार प्रत्युत्तर
सेट बॅकचे उत्तर कमबॅकने देऊ! ‘बिग बीं’ने हटके शब्दात वाढवला टीम इंडियाचा उत्साह
ट्रेंडिंग लेख –
IND v AUS: कसोटी सामन्यांदरम्यान स्टंप माईकमधून ऐकू आलेल्या ३ मजेदार शाब्दिक चकमकी
‘बॉक्सिंग डे कसोटी’ म्हणजे नक्की आहे तरी काय? जाणून घ्या सविस्तर
हिटमॅनचा ‘हिट’ कारनामा! ३ वर्षांपूर्वी रोहितने केवळ ३५ चेंडूत केली होती शतकी खेळी