ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात झालेल्या दुसऱ्या वन-डे सामन्यात भारताच यष्टीरक्षक एमएस धोनीने 55 धावांची खेळी केली. हा सामना भारताने 6 विकेट्सने जिंकत तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे.
या सामन्यात एमएस धोनीने जबरदस्त कामगिरी केली. भारताच्या या माजी कर्णधाराला त्याच्या शांत स्वभावामुळे कॅप्टनकूल असे म्हटले जाते. मात्र या सामन्यात ड्रींक्स ब्रेक दरम्यान धोनी खलील अहमदवर चांगलाच चिडला होता. यावेळी त्याने खलीलला अपशब्दही वापरले.
कर्णधार विराट कोहली बाद झाल्यावर फलंदाजीला आलेल्या दिनेश कार्तिक धोनीबरोबर चांगली भागीदारी करत होता. कोहली बाद झाल्यावर भारताला 38 चेंडूमध्ये 57 धावा करण्याच्या बाकी होत्या. यामध्ये धोनीने मोठे शॉट्स न खेळता एकेरी आणि दुहेरी धावा घेण्यावर भर दिला. यामुळे तो फार थकलाही होता.
झाले असे की, ड्रींक्स ब्रेकवेळी खलील धोनीला आणि दिनेश कार्तिकला पाणी देण्यासाठी आला होता. यावेळी खलील खेळपट्टीवरून स्पाईक्स असलेले शूज घालून चालत येत होता. स्पाईक्स शूजमुळे फलंदाजाला खेळपट्टीवर खेळण्यास अडचणी येतात. या सामन्यात धोनीला कोणतीही चूक करायची नव्हती. म्हणून धोनी त्याच्यावर चिडला आणि त्याला खेळपट्टीवरून चालत यायला हातवारे करून मनाई करत होता.
त्याचबरोबर युजवेंद्र चहल धोनीला हेल्मेट देण्यासाठी आला होता. मात्र धोनीच्या रागाचा पारा बघत त्याने धोनीकडे हेल्मेट फेकून पास केले.
https://twitter.com/premchoprafan/status/1085135731457224705
Khaleel deserved this bashing from Dhoni. Absolutely lethargic display by Khaleel Ahmed on field. What an innings by MSD.👏🏼 #INDvAUS #AUSvIND pic.twitter.com/uQOCJxfSq6
— Ankit Bera (@Ankit_Bera) January 15, 2019
महत्त्वाच्या बातम्या-
–दिग्गज लोकांना त्यांचे महत्त्व पटवून देण्याची गरज नसते- जसप्रीत बुमराह
–धोनी धोनी है! विराट कोहलीचाही विक्रम टाकला मागे
–त्या यादीत सचिन, लक्ष्मण, मनीष पांडेसह आता विराटचेही नाव