भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आगामी काळात तिन्ही प्रकारच्या क्रिकेट सामन्यांची मालिका खेळली जाईल. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे आणि टी20 मालिकेनंतर कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे. भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माची दुखापतीमुळे वनडे आणि टी20 संघात निवड झाली नाही. त्याचबरोबर विराट कोहली 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेचा पहिलाच सामना खेळून भारतात परतणार आहे. या दोघांच्या अनुपस्थितीत भारतीय संघ कशी कामगिरी करेल? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
रोहित आणि विराटच्या अनुपस्थितीबद्दल ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने महत्वाचे भाष्य केले आहे.
रोहितच्या अनुपस्थितिमुळे पडेल फरक
रोहित शर्माच्या अनुपस्थितीबद्दल बोलताना स्टीव्ह स्मिथ म्हणाला की, “रोहित मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील शानदार फलंदाज आहे. सलामीवीर फलंदाज म्हणून त्याने हे सिद्ध केले आहे. त्याच्या अनुपस्थितीमुळे या मालिकेत नक्कीच फरक पडेल.”
विराटच्या अनुपस्थितीचा भारतीय संघावर होईल प्रभाव
विराटबद्दल बोलताना स्मिथ म्हणाला की, “विराट कोहली वरच्या फळीतील फलंदाज आहे. तिन्ही प्रकारच्या क्रिकेट सामन्यात तो सातत्याने चांगली कामगिरी करत आहे, हे आपल्याला माहीतच आहे. त्याच्या अनुपस्थितिचा प्रभाव भारतीय संघावर होईल.”
केएल राहुल आणि मयंक अगरवाल करू शकतात भरपाई
भारताचे युवा फलंदाज आणि आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू केएल राहुल आणि मयंक अगरवाल यांचीही ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तिन्ही क्रिकेट प्रकारच्या मालिकांसाठी निवड झाली आहे.
या दोन खेळाडूंबद्दल बोलताना स्टीव्ह स्मिथ म्हणाला की, “आयपीएलमध्ये केएल राहुल आणि मयंक अगरवाल यांनी जबरदस्त कामगिरी केली होती. त्यामुळे वरच्या फळीत फलंदाजीसाठी भारतीय संघाकडे उत्तम पर्याय आहे. दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीत हे खेळाडू त्यांची भरपाई करू शकतात.”
…तो कठीण क्षण होता
सन 2018-19 मध्ये भारतीय संघाने कासोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते. याबद्दल बोलताना स्मिथ म्हणाला की, “मागील हंगामात टीम पेनच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया संघाचा 1-2 अशा फरकाने पराभव झाला होता. तो एक कठीण क्षण होता.”
खेळाडूंना स्लेजिंग करायला आवडणार नाही
“भारत आणि ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान बरीच स्लेजिंग पाहायला मिळते. मात्र आता असं होतं नाही, कारण दोन्ही देशातील खेळाडू आयपीएलमध्ये एकत्र खेळतात. त्यामुळे कोणत्याही खेळाडूला स्लेजिंग करायला आवडणार नाही.” असेही पुढे बोलताना स्मिथ म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या –
सौरव गांगुलीने साडेचार महिन्यात केलेल्या कोरोना चाचण्यांचा आकडा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल
आयसीसीला मिळाला नवा अध्यक्ष; मतदानात ‘या’ व्यक्तीने मारली बाजी
कसोटी मालिकेत विराटच्या अनुपस्थितीबद्दल सचिन तेंडुलकरचे मोठे भाष्य, म्हणाला…
ट्रेंडिंग लेख –
१९ वर्षीय पार्थिव पटेल थेट ऑस्ट्रेलियात स्टीव्ह वॉला नडला पण…
वनडे मालिकेत ‘या’ तिघांना बसावे लागू शकते बाकावर; गिलचाही समावेश