ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात पर्थमध्ये तिसरा एकदिवसीय सामना खेळला गेला. पर्थच्या उसळत्या खेळपट्टीवर पाकिस्तानचे वेगवान गोलंदाजांची कहर कामगिरी पाहायला मिळाली. शिवाय ऑस्ट्रेलियन फलंदाज नसीम शाह आणि हरिस रौफ यांच्या चेंडूवर खेळताना झगडताना पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 140 धावांचा पाठलाग करुन पाकिस्तानने मालिका खिशात टाकली आहे. पाकिस्तानने 22 वर्षांत प्रथमच ऑस्ट्रेलियात एकदिवसीय मालिका जिंकली आहे.
मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात पहिल्या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने सर्व विकेट्स गमवून केवळ 140 धावा केल्या. पाकिस्तानकडून नसीम शाह आणि शाहीन आफ्रिदी यांनी प्रत्येकी तीन-तीन तर हरिस रौफने देखील दोन विकेट्स मिळवल्या.
या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघाने हा निर्णय पूर्णपणे योग्य असल्याचे सिद्ध केले. ऑस्ट्रेलियासाठी डावाची सलामी देण्यासाठी आलेला जॅक फ्रेझर मॅकगर्क पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. त्याला नसीम शाहने बाद केले. त्याला 9 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने केवळ सात धावा करता आल्या.
यानंतर तिसऱ्या क्रमांकावर असलेला ॲरॉन हार्डीही जास्त वेळ क्रीजवर राहू शकला नाही. त्याला शाहीन आफ्रिदीने बाद केले. तो 13 चेंडूंत दोन चौकारांच्या मदतीने 12 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. 36 धावांत दोन गडी बाद झाल्यानंतर कांगारूंना कर्णधार जोश इंग्लिसकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण त्याने पुन्हा एकदा निराशा केली.
जोश इंग्लिश 19 चेंडूंत एका चौकाराच्या मदतीने सात धावा करून बाद झाला. नसीम शाहने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर हारिस रौफने सेट झालेल्या मॅथ्यू शॉर्टला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. 30 चेंडूत 22 धावा करून तो बाद झाला.
टॉप ऑर्डर पूर्ण फ्लॉप झाल्यानंतर शेवटची आशा मार्कस स्टॉइनिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्याकडून होती. पण हे दोन दिग्गजही पाकिस्तानी गोलंदाजांसमोर तग धरू शकले नाहीत. 25 चेंडूत आठ धावा करून स्टॉइनिस बाद झाला. तर मॅक्सवेलला खातेही उघडता आले नाही. आशाप्रकारे पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजीच्या माऱ्यासमोर कांगारु संघ पूर्णपणे फ्लाॅप ठरला आणि संघाला केवळ 140 धावां करता आल्या.
140 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानकडून सैम अयुब आणि अब्दुल्ला शफीक यांनी निर्णायक 85 धावांची भागीदारी केली. ज्यामध्ये सैम अयुबने सर्वाधिक 42 धावांची खेळी खेळली. पाकिस्तानचा नवा कर्णधार मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वात संघाने 22 वर्षांत प्रथमचं ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर वनडे मालिका जिंकली आहे.
हेही वाचा-
SA VS IND; दुसऱ्या टी20 सामन्यात संजू सॅमसनला इतिहास रचण्याची संधी
अद्भुत! एका हातानं पकडला सीमारेषेकडे जाणार चेंडू, फलंदाजाचाही विश्वास बसेना; VIDEO पाहा
टीम इंडियाला सुधारावी लागणार ही मोठी चूक, अन्यथा दुसऱ्या टी20 मध्ये पराभव अटळ