---Advertisement---

लग्न सोडून क्रिकेट पाहत असलेल्या नवविवाहीत जोडप्यांचा फोटो झाला वायरल

On: शनिवार, नोव्हेंबर 9, 2019 2:26 PM
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय  क्रिकेट मंडळाने  (आयसीसी) ने बुधवारी लग्नाचा सोहळा सोडून टीव्ही वर क्रिकेट सामना पाहत असलेल्या एका नवविवाहीत जोडप्याटा फोटो शेअर केला आहे.

तसेच या जोडप्याबद्दल आयसीसीने लिहिले की, अमेरिकेत राहत असलेल्या या क्रिकेट चाहत्याकडून एक संदेश मिळाला आहे की लग्नादरम्यानही हे जोडपे क्रिकेट पाहणे विसरले नाही.

फोटोमध्ये दिसणारा नवरा मुलगा हा मुळचा पाकिस्तानचा रहिवासी असून त्याचे हसन तस्लीम आहे. हसनने स्वत: हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.

मंगळवारी लग्नानंतर हसन पारंपारिक शैलीत वधूसह उत्तर अमेरिकेतील आपल्या घरात दाखल झाला. यादरम्यान, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन टी -20 मालिकेचा दुसरा सामना खेळला जात होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला 7 गडी राखून पराभूत केले.

हसन लग्न झाल्यानंतर खूप थकलेला होता, तरी त्याने मध्यरात्री पर्यंत जागून सामना पाहिला. या कारणामुळे आयसीसीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडल त्यांचा वरून फोटो शेअर केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---