ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात मंगळवारी (1 नोव्हेंबर) इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड (ENGvNZ) हा सामना खेळला गेला. उपांत्य फेरीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या सामन्यात इंग्लंडने 20 धावांनी विजय मिळवला. इंग्लंडच्या विजयाने अ गटातील समीकरणे आता चांगलीच किचकट बनली आहेत. संपूर्ण समीकरणांवर नजर टाकल्यास गतविजेता व यजमान संघ ऑस्ट्रेलियाच स्पर्धेबाहेर होऊ शकतो. (Australia Will Be Out Of T20 World Cup)
उपांत्य फेरीच्या दृष्टीने हा सामना अत्यंत महत्त्वाचा होता. या सामन्यात इंग्लंडचा पराभव झाला असता तर, त्यांची उपांत्य फेरीत पोहोचण्याची आशा मावळली असती. मात्र, इंग्लंडने मोक्याच्या क्षणी खेळ उंचावत गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले. अ गटात सर्व संघांनी प्रत्येकी चार सामने खेळले असून, अफगाणिस्तान तीन पराभवांसह स्पर्धेतून बाहेर झाला आहे. आयर्लंडने चार सामन्यात एक विजय, दोन पराभव व एका रद्द झालेल्या सामन्याच्या गुणासह तीन गुण मिळवले आहेत. त्यामुळे एकूण परिस्थिती पाहता तेदेखील उपांत्य फेरीसाठी पात्र ठरण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.
गटातील इतर चार संघ अजूनही उपांत्य फेरीच्या शर्यतीत आहेत. न्यूझीलंड, इंग्लंड व ऑस्ट्रेलिया या तीनही संघांचे प्रत्येकी पाच गुण झालेत. न्यूझीलंडचा रनरेट सर्वोत्तम असल्याने तसेच त्यांचा अखेरचा सामना तुलनेने दुबळ्या आयर्लंडविरुद्ध होईल. या सामन्यात त्यांनी एका धावेने विजय मिळवला तरी ते गटात अव्वलस्थानी राहतील. या गटातील शेवटून दुसरा सामना ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात होईल. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 134 पेक्षा जास्त धावांनी विजय मिळवला तरी ते न्यूझीलंडच्या रनरेटची बरोबरी करू शकत नाहीत. त्यानंतर या गटातील अखेरचा सामना इंग्लंड विरुद्ध श्रीलंका असा होईल. या सामन्यात इंग्लंडसमोर सामना किती धावांच्या फरकाने जिंकायचा अथवा किती षटकांमध्ये विजयी लक्ष पूर्ण करायचे हे चित्र स्पष्ट असेल. ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानला पराभूत केल्यास आणि श्रीलंकेने इंग्लंडवर मात केल्यास ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडसह उपांत्य फेरीत दाखल होईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘बटलर शो’नंतर गोलंदाजांच्या जोरावर इंग्लंडचा शानदार विजय; न्यूझीलंडच्या खात्यात पहिली हार
यष्टीरक्षकाच्या भूमिकेत कुणालाच जमलं नाही ते बटलरनं केलं! 100व्या टी-20 सामन्यात लावली विक्रमांची रास