Monday, March 27, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

यष्टीरक्षकाच्या भूमिकेत कुणालाच जमलं नाही ते बटलरनं केलं! 100व्या टी-20 सामन्यात लावली विक्रमांची रास

यष्टीरक्षकाच्या भूमिकेत कुणालाच जमलं नाही ते बटलरनं केलं! 100व्या टी-20 सामन्यात लावली विक्रमांची रास

November 1, 2022
in T20 World Cup, क्रिकेट, टॉप बातम्या
jos buttler

Photo Courtesy : Twitter/ICC


मंगळवारी (1 नोव्हेंबर) इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील रोमांचक लढत चाहत्यांना पाहायला मिळाली. इंग्लंडने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने स्वतः जबरदस्त खेळी करून मोठी धावसंख्या केली. इंग्लंडने मर्यादित 20 षटकांमध्ये 6 विकेट्सच्या नुकसानावर 179 धावा केल्या. बटलने इंग्लंडसाठी सर्वाधिक 73 धावा केल्या. या खेळीच्या जोरावर बटलर इंग्लंडसाठी आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. 

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने 47 चेंडू खेळले आणि 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 73 धावा केल्या. या खेळीनंतर त्याने इंग्लंडचा माजी कर्णधार इऑन मॉर्गन (Eoin Morgan) याला मागे सोडत संघासाठी आंतरराष्ट्री टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. जोस बटलरच्या नावावपुढे आता 2468 आंतरराष्ट्रीय टी-20 धावांची नोंद झाली आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 2458 धावा करणारा मॉर्गन यापूर्वी या यादीत पहिल्या क्रमांकावर होता. आता बटलरमुळे मॉर्गन दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. यादीत तिसरा क्रमांकाल एलेक्स हेल्स (Alex Hales) आहे, ज्याने 1940 धावा केल्या आहेत.

इंग्लंडसाठी आंतरारष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज 
2468 – जोस बटलर
2458 – इऑन मॉर्गन
1940 – एलेक्स हेल्स

दरम्यान, जोस बटलरसाठी इतरही काही कारणांमुळे न्यूझीलंडविरुद्धचा हा सामना खास ठरला. त्याच्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हा 100 वा सामना होता. इऑन मॉर्गननंतर (115) तो इंग्लंडसाठी सर्वाधिक टी-20 सामने खेळणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. या सामन्यात तो टी-20 फॉरमॅटमध्ये इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरलाच, पण त्याचसोबत त्याने अजून एक मोठा विक्रमही नावावर केला. तो या सामन्यानंतर टी-20 फॉरमॅटमध्ये 100 षटकार मारणारा पहिला यष्टीरक्षक फलंदाज देखील आहे. तसेच इंग्लंडचा पहिला असा कर्णधार देखील बनला, ज्याने टी-20 विश्वचषकात अर्धशतक केले आहे. यापूर्वी इंग्लंडचा एकही कर्णधार टी-20 विश्वचषकात अर्धशतकी खेळी करू शकला नव्हता. इंग्लंडसा

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
खास रे! भल्याभल्यांना न जमलेली कामगिरी श्रीलंकेच्या सिंहांनी करून दाखवलीय
अरे काय हे, बांगलादेशविरुद्धही राहुलच करणार ओपनिंग! हेड कोच द्रविडने सांगितले त्यामागचे कारण 


Next Post
Photo Courtesy: Twitter/ICC

'बटलर शो'नंतर गोलंदाजांच्या जोरावर इंग्लंडचा शानदार विजय; न्यूझीलंडच्या खात्यात पहिली हार

Virat-Kohli

हॉटेल रूमचा व्हिडिओ काढणाऱ्याला दिलासा, तक्रार दाखल करण्यासाठी विराटचा स्पष्ट नकार

Photo Courtesy: Twitter/England Cricket

तेजतर्रार! आपल्या गोलंदाजीने अक्षरशः आग ओकतोय वूड; आता टाकला 'या' वेगाने चेंडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143