---Advertisement---

AUS vs SL; कांगारूंनी रचला इतिहास, 14 वर्षांनंतर केली अशी कामगिरी

On: रविवार, फेब्रुवारी 9, 2025 7:20 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका (Australia vs Sri Lanka) संघात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. या मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाने श्रीलंकेच्या भूमीवर इतिहास रचला आहे. गॅले येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी कांगारूंनी यजमान श्रीलंकेचा 9 विकेट्सने धुव्वा उडवला. यासह, ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेच्या संघाच्या घरच्या मैदानावर त्यांना 2-0 ने व्हाईटवॉश दिला आहे. अशाप्रकारे, ऑस्ट्रेलियाने 14 वर्षांनी श्रीलंकेच्या भूमीवर कसोटी मालिका जिंकली आहे.

रविवारी चौथ्या दिवशी श्रीलंकेच्या संघाला लवकर बाद केल्यानंतर, ऑस्ट्रेलियाला विजयासाठी फक्त 75 धावांची आवश्यकता होती. ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा आणि मार्नस लाबुशेन यांनी 18 षटकांपेक्षा कमी वेळेत लक्ष्य गाठले. श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात नाथन लायन आणि मॅथ्यू कुहनेमन यांनी प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या आणि पहिल्या डावात मिळालेल्या त्यांच्या मागील यशात आणखी भर घातली.

यापूर्वी, 2011 मध्ये, कांगारू संघाने रिकी पॉन्टिंगच्या (Ricky Ponting) नेतृत्वाखाली श्रीलंकेच्या भूमीवर 1-0 ने कसोटी मालिका जिंकली होती. त्यानंतर यंदा ऑस्ट्रेलियाने स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली 2-0 ने कसोटी मालिका मालिका जिंकली आणि इतिहास रचला.

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग 11-

ऑस्ट्रेलिया- उस्मान खवाजा, ट्रॅव्हिस हेड, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), मार्नस लाबुशेन, अलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), कूपर कॉनली, जोश इंग्लिस, मॅथ्यू कुहनेमॅन, नाथन लायन, मिशेल स्टार्क, टॉड मर्फी

श्रीलंका- दिमुथ करुणारत्ने, लाहिरु थिरिमान, कुसल मेंडीस (यष्टीरक्षक), अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चांडीमल, कामिंदू मेंडीस, रमेश मेंडीस, प्रभात जयसुर्या, निशान पेरिस, लाहिरु कुमारा, असिथा फर्नांडो

महत्त्वाच्या बातम्या-

IND vs ENG; युवा खेळाडूवर भडकला भारतीय कर्णधार! म्हणाला, “मेंदू कुठे…”
ऑस्ट्रेलियाची शानदार विजयी परतफेड; श्रीलंकेचा केला घरात घुसून अपमान
टीम इंडियात नवा सुपरस्टार; ‘या’ खेळाडूला मिळाली पदार्पणाची संधी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---