ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाची विश्वविजेती कर्णधार मेग लॅनिंग हिने बुधवारी (१० ऑगस्ट) तत्काळ प्रभावाने क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ट्वीटरद्वारे याबद्दल अधिकृत माहिती दिली आहे. वैयक्तिक कारणामुळे तिने हा मोठा निर्णय घेतला आहे. नुकताच तिच्या नेतृत्त्वाखाली ऑस्ट्रेलिया संघाने कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. तसेच ती ऑस्ट्रेलियाची वनडे आणि टी२० विश्वचषक विजेती कर्णधारही आहे.
आपल्या या निर्णयाबद्दल बोलताना लॅनिंग म्हणाली की, “काही व्यस्त वर्षांनंतर शेवटी मी क्रिकेटमधून काही काळासाठी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून मला स्वतला वेळ देता येईल. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने माझ्या निर्णयाचा आदर केल्यामुळे मी त्यांची आभारी आहे. तसेच माझ्या संघ सहकारींनीही माझ्या वैयक्तिक आयुष्याचा आदर केल्याने मी त्यांचेही आभार व्यक्त करते.”
The @AusWomenCricket skipper has our full support as she takes some time away from the game 💛💚 pic.twitter.com/iMs62ASwWe
— Cricket Australia (@CricketAus) August 10, 2022
दरम्यान ऑस्ट्रेलिया महिला संघाने नुकतेच तिच्या नेतृत्त्वाखाली कॉमनवेल्थ गेम्समध्ये विजेतेपदक पटकावले आहे. पहिल्यांदाच महिला क्रिकेट संघ कॉमनवेल्थ गेम्समध्ये सहभागी झाला होता. या स्पर्धेतील साखळी फेरी सामन्यातील ३ पैकी ३ सामने जिंकत ऑस्ट्रेलिया संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. उपांत्य फेरीत न्यूझीलंडवर ५ विकेट्सने विजय मिळवत ऑस्ट्रेलिया संघ अंतिम सामन्यात पोहोचला होता. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा आमना सामना करताना ९ विकेट्सने विजय मिळवला आणि विजेतेपद पटकावले आहे.
याखेरीज लॅनिंगच्या नेतृत्त्वाखाली ऑस्ट्रेलिया महिला संघाने ३ टी२० विश्वचषक आणि १ वनडे विश्वचषक जिंकला आहे. ती २०१४, २०१८ आणि २०२० टी२० विश्वचषक जिंकणारी कर्णधार आहे. तसेच तिच्या कर्णधारपदाखाली ऑस्ट्रेलियाने २०२२ सालचा वनडे विश्वचषकही पटकावला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
घरच्या लग्नात फेटा घालून सहभागी झाला मास्टर ब्लास्टर, साराच्या लूकवर नेटकरी फिदा
VIDEO। संजूने अनोख्या अंदाजात केलं चाहत्यांचं अभिवादन, गाडीतून उतरत थेट ठोकला सलाम
जबरच! फलंदाजाने केलाय नव्या शॉटचा अविष्कार, आयसीसीलाही घ्यावी लागली दखल