---Advertisement---

टीम इंडियाची विश्वचषकातील अंतिम लढत पहा या ठिकाणी

On: शनिवार, मार्च 7, 2020 6:12 PM
---Advertisement---

मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर उद्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यान महिला टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना होत आहे. या सामन्यात भारतीय संघाच नेतृत्त्व हरमनप्रीत कौर करत आहे. भारतीय संघ पहिल्यांदाच टी२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत गेला आहे.

यामुळे या सामन्याला वेगळेच महत्त्व आले आहे. भारत काय? जगातील तमाम क्रिकेटप्रेमींचे लक्ष या सामन्यावर लागले आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर दुपारी १२.३० वाजता सुरु होईल.

हा भारतातील प्रेक्षक स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर स्टॅडर्ड व एचडी प्रकारात पाहु शकतात. तसेच ऑनलाईन सामने हे हाॅटस्टारच्या माध्यमातून पाहु शकतात.

८ मार्च रोजी महिला दिन रविवारी येत असल्यामुळे त्यातही भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरचा ३१वा वाढदिवस असल्यामुळे या सामन्याला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---