न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिला वनडे विश्वचषक २०२२ चा अंतिम सामना रविवारी (०३ एप्रिल) ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड संघात झाला. या सामन्यात उभय संघातील फलंदाज आणि गोलंदाजांनी शानदार प्रदर्शन केले. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर एलिसा हिलीच्या दीडशतकी खेळीच्या जोरावर ३५६ धावा फलकावर लावल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ ४४ षटकांमध्येच २८५ धावांवर गारद झाला आणि ऑस्ट्रेलियाने ७१ धावांनी सामना जिंकत विश्वचषकावरही नाव कोरले.
ऑस्ट्रेलियाने नवव्यांदा विश्वचषक अंतिम सामना खेळताना सातव्यांदा ट्रॉफी जिंकली आहे. तर इंग्लंडला चौथ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे.
https://twitter.com/cricketworldcup/status/1510526325244641282?s=20&t=IecuSFDgTajfekCKIsd5Lw
इंग्लंडच्या स्किव्हरची एकाकी झुंज व्यर्थ
ऑस्ट्रेलियाच्या ३५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडकडून नतालिया स्किव्हरने एकाकी झुंज दिली. मात्र तिला इतर फलंदाजांची साथ न मिळाल्याने ती संघाचा पराभव टाळू शकली नाही. तिने सामन्याअंती नाबाद राहात १४८ धावा फटकावल्या. यादरम्यान तिने १२१ चेंडू खेळले आणि १ षटकार व १५ चौकारही मारले. परंतु इंग्लंडच्या इतर फलंदाज साध्या ३० धावाही करू शकल्या नाहीत. परिणामस्वरूप इंग्लंडचा संघ ४३.४ षटकांमध्येच २८५ धावांवर सर्वबाद झाला.
https://twitter.com/ICC/status/1510517956530552832?s=20&t=IecuSFDgTajfekCKIsd5Lw
इंग्लंडकडून या डावात एलाना किंग आणि जेस जोनासनने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तसेच मेगन शटने २ विकेट्सचे योगदान दिले. याखेरीज तहिला मॅकग्राथ आणि एश्ले गार्डनरनेही एका-एका फलंदाजाला बाद केले.
एलिसा हिलीचे शानदार दीडशतक
तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांमध्ये ५ विकेट्सच्या नुकसानावर ३५६ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून यष्टीरक्षक एलिसा हिली हिने धुव्वादार दीडशतकी खेळी केली होती. १३८ चेंडू खेळताना २६ चौकारांच्या मदतीने तिने १७० धावा चोपल्या होत्या. तसेच रिचेल हायनेस आणि बेथ मूनी यांनीही अर्धशतके ठोकली होती. हायनेसने ९३ चेंडू खेळताना ७ चौकारांच्या मदतीने ६८ धावा केल्या होत्या. तर मूनीने ४७ चेंडू खेळताना ८ चौकारांच्या साहाय्याने ६२ धावा जोडल्या होत्या.
https://twitter.com/ICC/status/1510471075628519424?s=20&t=IecuSFDgTajfekCKIsd5Lw
या डावात इंग्लंडकडून ऍना श्रूबसोलने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच सोफी एक्लेस्टोनेही एका विकेटचे योगदान दिले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL2022| चेन्नई वि. पंजाब सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!