शुक्रवार रोजी (२५ मार्च) ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश यांच्यात आयसीसी महिला वनडे विश्वचषकातील २५ वा सामना झाला. वेलिंग्टन येथे झालेला हा सामना ऑस्ट्रेलियाने ५ विकेट्स राखून जिंकला. हा ऑस्ट्रेलियाचा शेवटचा साखळी फेरी होता. हा सामनाही जिंकत ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत उडी मारली आहे. तर बांगलादेशचा हा पाचवा पराभव होता.
या सामन्यात (AUSW vs BANW) पावसाचा व्यत्यय आल्यामुळे सामना ५० षटकांऐवजी ४३ षटकांचा झाला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी निवडल्याने बांगलादेशचा संघ पहिल्यांदा फलंदाजीसाठी मैदानावर उतरला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने ४३ षटकांमध्ये ६ विकेट्सच्या नुकसानावर १३५ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाच्या संघाने ३३ षटकांमध्ये ५ विकेट्स गमावत बांगलादेशचे लक्ष्य सहज पूर्ण केले आणि ५ विकेट्स राखून सामनाही (AUSW Beat BANW) जिंकला.
प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशकडून एकाही फलंदाजांला मोठ्या खेळी करता आल्या नाहीत. खालच्या फळीत लता मंडळने सर्वाधिक ३३ धावा केल्या. तसेच शरमिन अख्तरने २४ धावा आणि रुमाना अहमद आणि सलमा खातून यांनीही प्रत्येकी १५ धावांचे योगदान दिले. परिणामी बांगलादेशने १३५ धावा फलकावर लावल्या.
या डावात ऑस्ट्रेलियाकडून ऍश्ले गार्डनर आणि जेस जोनासन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच मेगन शट आणि ऍनाबेल सदरलँड यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली होती.
Australia maintain their unbeaten record at #CWC22 after beating Bangladesh by 5 wickets 👏 pic.twitter.com/JT95qhWJqO
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 25, 2022
बांगलादेशच्या १३६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार बेथ मूनी हिने चिवट झुंज दिली. इतर फलंदाज सपशेल फोल ठरत असताना तिने ७५ चेंडूंमध्ये नाबाद ६६ धावा फटकावल्या. या शानदार खेळीदरम्यान तिने ५ चौकारही मारले. तसेच ऍनाबेल सदरलँडने शेवटच्या षटकात नाबाद राहात २६ धावांची खेळी केली. या खेळींमुळे ऑस्ट्रेलियाने ३२.१ षटकातच बांगलादेशचे लक्ष्य पूर्ण केले आणि सामनाही जिंकला.
या डावात बांगलादेशकडून सलमा खातून हिने शानदार गोलंदाजी केली होती. तिने ९ षटके टाकताना २३ धावा देत ऑस्ट्रेलियाच्या ३ फलंदाजांना बाद केले होते. मात्र तिला इतर गोलदाजांची साथ न मिळाल्याने ती संघाचा पराभव टाळू शकली नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलमधील ‘कॅप्टनकूल’ एमएस धोनीचे ‘हे’ विक्रम मोडणे अन्य कर्णधारांसाठी कठीण
धोनी-विराटने सोडले कर्णधारपद, आता आयपीएल २०२२ मध्ये दिसतील ‘हे’ चार नवीन कर्णधार
IPL 2022 मध्ये विदेशी खेळाडूंची भरमार, जाणून घ्या कोण करणार कोणत्या संघाचे प्रतिनिधित्व