भारतीय महिला क्रिकेट संघ व ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ यांच्या दरम्यानच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील अखेरचा सामना मंगळवारी (20 डिसेंबर) खेळला गेला. ब्रेबॉर्न स्टेडियम येथे खेळला गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने भारतीय संघाला अक्षरशः निष्प्रभ करत 54 धावांनी विजय संपादन केला. यासह पाहुण्या संघाने मालिकेत 4-1 असा विजय मिळवला.
A dominant display by Australia in the final match against India 👊
They take the T20I series 4-1 👏#INDvAUS | 📝: https://t.co/jljaJT2z4y pic.twitter.com/jn6qXUfP3m
— ICC (@ICC) December 20, 2022
यापूर्वीच मालिका गमावलेल्या भारतीय संघाला या सामन्यात आपली प्रतिष्ठा राखण्याचे आव्हान होते. या सामन्यात नियमित कर्णधार एलिसा हिली हिच्या जागी ताहिला मॅकग्रा हिने ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले. भारतीय गोलंदाजांनी या सामन्यात अगदी त्वेषाने गोलंदाजी करताना 9.4 षटकात 67 धावांवर ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख चार फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. भारतीय संघ सामन्यात आघाडी घेणार असे वाटत असतानाच, अनुभवी अष्टपैलू ऍश्ले गार्डनर व ग्रेस हॅरिस यांनी भारतीय गोलंदाजांवर प्रतिआक्रमण केले.
गार्डनरने 11 चौकार व एका षटकाराच्या मदतीने केवळ 32 चेंडूंवर नाबाद 66 तर, हॅरिसने 35 चेंडूवर 64 धावांची खेळी केली. यात 6 चौकार व 4 षटकारांचा समावेश होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने निर्धारित 20 षटकात 4 बाद 196 अशी मोठी मजल मारली.
या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती. मात्र, स्मृती मंधाना ही पहिल्याच षटकात माघारी परतली. तर शफाली वर्मा, रिचा घोष व कर्णधार हरमनप्रीत कौर यांनाही मोठी धावसंख्या रचता आली नाही. चांगल्या फॉर्म मध्ये दिसत असलेली हरलीन देओल 24 धावांवर दुर्दैवीरीत्या धावबाद झाली. भारतीय संघ अडचणीत असताना अष्टपैलू दीप्ती शर्मा हिने वेगवान खेळी केली. अखेरचा चेंडूवर बाद होण्यापूर्वी तिने अर्धशतक पूर्ण केले. ऑस्ट्रेलियासाठी युवा हीदर ग्रॅहमने हॅट्रिकसह सर्वाधिक चार बळी मिळवले. ऍश्ले गार्डनरला सामनावीर व मालिकावीर असे दोन्ही पुरस्कार देण्यात आले.
(Australia Womens Beat India Womens In Fifth T20 By 54 Runs)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अर्जुन नक्कीच यशस्वी क्रिकेटपटू होणार! सचिनच्याच शिष्याने व्यक्त केला विश्वास
नागपूरने पुण्याचा पराभव करत पटकावले आंतर-जिल्हा फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद