नागपूरने पेनाल्टी शूट आऊटमध्ये पुणे संघाचे आव्हान ४-२ असे परतवून लावत वायफा आंतर जिल्हा फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद पटकावले. म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात पार पडलेल्या अंतिम सामन्यात नियोजित वेळेत १-१ अशी बरोबरीची कोंडू फुटू शकली नाही. त्यानंतर शूट आऊटमध्ये नागपूरने ४-२ अशी बाजी मारली.
घरच्या मैदानावर खेळताना पुण्याच्या खेळाडूंनी जोरदार प्रयत्न केले. मध्यंतराला सामना गोलशून्य बरोबरीत होता. उत्तरार्धात मात्र दुसऱ्याच मिनिटाला सुफियान शेखने नागपूरला आघाडीवर नेले. एका गोलच्या पिछाडीवरून पुणे संघाने आपला खेळ उंचावला. बचावावर भर देतानाच त्यांनी आपली आक्रमणेही वाढवली. मात्र, त्यांना अपयशच आले. अखेरीस ८२व्या मिनिटाला मोहंमद साहाबने नोंदवलेल्या स्वयंगोलने पुणे संघाला सामना बरोबरीत नेल्याचे समाधान लाभले.
शूट आऊट मध्ये नागपूरकडन स्टॅनले पीटर, सागर चिंताला, निर्मल मुंडा, सुफियान शेख यांनी गोलजाळीचा अचूक वेध घेतला. पुणे संघाकडून जीवन राहव आणि शुभम पेडणेकर यांनाच लक्ष्य साधण्यात यश आले. हर्षद गावडे आणि आयुष दिपक यांचे प्रयत्न असफल ठरले.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ ध्रुव डेटा सोल्युशनचे उपाध्यक्ष गिरीश मुजमदार, आणि आयपीएस अधिकारी सुधिर हिरेमठ, वायफाचे खजिनदार आणि पुणे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष प्यारेलाल चौधरी, सचिव प्रदीप परदेशी उपस्थित होते. यांच्या हस्ते पार पडला.
निकाल – नागपूर १ (४) (सुफियान शेख ४७वे मिनिट, स्टॅनले पीटर, सागर चिंताळा, निर्मल मुंडा, सुफियान शेख) वि.वि. पुणे १ (२) (मोहंमद साहाब ८२वे मिनिट, जीवन रावत शुभम पेडणेकर)
वैयक्तिक पारितोषिके
सर्वोत्कृष्ट गोलरक्षक -ओएसिस खान (नागपूर)
सर्वोत्कृष्ट बचावपटू – सिद्धांत प्रणय (पुणे)
सर्वोत्कृष्ट मध्यरक्षक – श्रीकांत मोलनगिरी (पुणे)
सर्वाधिक गोल – सुमित भंडारी (पुणे, ९ गोल)
स्पर्धेचा मानकरी – सुफियान शेख (नागपूर)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘महाराष्ट्र केसरी’चा थरार १० ते १४ जानेवारी २०२३ दरम्यान रंगणार
पाकिस्तानचा शादाब खान गाजतोय ऑस्ट्रेलियात! ‘गरुडझेप’ घेत पकडला झेल, पाहा व्हिडिओ